दीपिकाचे लव्हर्स एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 08:29 IST2016-03-12T15:29:43+5:302016-03-12T08:29:43+5:30

बॉलिवूडमध्ये नातेसंबंध किती झटपट बदलू शकतात याचा काही नेम नाही. कित्येक वर्षे रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या प्रेमाचे चर्चे ...

Deepika's lover together? | दीपिकाचे लव्हर्स एकत्र?

दीपिकाचे लव्हर्स एकत्र?

लिवूडमध्ये नातेसंबंध किती झटपट बदलू शकतात याचा काही नेम नाही. कित्येक वर्षे रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या प्रेमाचे चर्चे होते. दोघे लग्न करणार अशीदेखील अफवा उडाली होती. पण बॉलिवूडच्या नियमानुसार लवकरच दोघांचा बे्रकअप झाला.

तिकडे अनुष्का शर्मापासून रणवीर सिंग वेगळा झाला. ‘रामलीला’च्या सेटवर रणवीर-दीपिकाचा रोमॅन्स चांगलाच बहरला आणि रणबीर आणि कॅटच्या अफेयरचीदेखील सुरूवात झाली. दरम्यान दीपिकाने एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबत दोन चित्रपटदेखील केले.

ranbir ranveer

‘ब्रेक अप झाले म्हणून काय झाले? आम्ही चांगले मित्र आहोत’, असे दोघे नेहमी म्हणायचे. पूर्वी रणबीरशी फटकून राहणारा रणवीर सिंगदेखील आता रणबीरसोबत पार्टी करताना दिसतो. दोघे अर्जुन कपूरच्या 30 व्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र होते.

इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे की, झोया अख्तर पुढच्या सिनेमात रणबीर आणि रणवीर सोबत काम करणार आहेत. ‘दिल धडकने दो’नंतर झोया रणवीरसोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक आहे. काही दिवसांपूर्वी त्याने झोयाच्या घरी जाऊन भेटसुद्धा घेतली. त्यामुळे रणवीरकडून निदानपक्षी होकार आहे, असे समजण्यास हरकत नाही.

ranveer Ranbir

आता दीपिकाचे दोन्ही लव्हर्स एकाच चित्रपटात करणार म्हटल्यावर वादळ तर उठणारच. पण अधिकृत घोषणा झाल्याशिवाय याविषयी स्वप्न रंगवण्यात काही अर्थ नाही.

Web Title: Deepika's lover together?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.