​दीपिका-विन डिझेलने दिल्या दिवाळी शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 14:18 IST2016-10-30T14:18:54+5:302016-10-30T14:18:54+5:30

विन तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये दिवाळीचा आनंद लुटताना काळजी घेण्याचा संदेश देतो.

Deepika-Vin Diesel wishes Diwali for Diwali | ​दीपिका-विन डिझेलने दिल्या दिवाळी शुभेच्छा

​दीपिका-विन डिझेलने दिल्या दिवाळी शुभेच्छा

पिका सध्या हॉलीवूड प्रोजेक्ट ‘ट्रिपल एक्स’मुळे प्रचंड व्यस्त आहे. चित्रपटाच्याबाबतीत मीडिया हाईप कायम ठेवण्यासाठी ती सर्वोतोपरी मेहनत घेताना दिसतेय.

दिवाळीनिमित्त तिने विन डिझेलकडून तमाम भारतीयांसाठी हिंदीमध्ये शुभेच्छापर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये विन तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये दिवाळीचा आनंद लुटताना काळजी घेण्याचा संदेश देतो.

संपूर्ण शूटींग दरम्यान दीपिका त्याला चांगलीच हिंदी शिकवली आहे. विशेष म्हणजे या व्हिडियोमध्ये विनने भारतीय पारंपरिक वेशुभषा केली होती. लाल रंगाची शेरवानी त्याला शोभून दिसते. दिवाळीमध्ये सुरक्षेचीसुद्धा काळजी घेण्याचे ते आवाहन करतात. तसचे खरा धमाका येत्या २० जानेवारीला होणार जेव्हा ‘ट्रिपल एक्स’ प्रदर्शित होईल.
                                
काही दिवसांपूर्वी खास भारतीय प्रेक्षकांनासमोर ठेवून चित्रपटाचे एक ट्रेलर लाँच करण्यात आले ज्यामध्ये दीपिकाचा डेडली अंदाज दिसला. तिने सिनेमात चांगलीच अ‍ॅक्शन केल्याचे कळते. बॉलीवूडपेक्षा तिची भूमिका अत्यंत वेगळी आहे. सलमान खानच्या ‘बिग बॉस’मध्ये दीपिकाने हजेरी लावून हे ट्रेलर लाँच केले.

भारतात एकूण चार भाषांत - हिंदी, इंग्लिश, तमिल आणि तेलगु - हा चित्रपट प्रदर्शित होणार असून भारतीय प्रेक्षकांना आवडेल अशी जबरदस्त अ‍ॅक्शन या चित्रपटात पाहायला मिळणार. दीपिकाचा हा विदेशी अंदाज प्रेक्षकांना किती रुचतो हे लवकरच कळेल.

Web Title: Deepika-Vin Diesel wishes Diwali for Diwali