Deepika Ranveer Wedding : दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या लग्नातील फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 07:13 PM2018-11-15T19:13:52+5:302018-11-15T20:09:32+5:30

अभिनेत्री दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांचा विवाह सोहळा कोंकणी व सिंधी पद्धतीत मोठ्या थाटामाटात पार पडला. नुकताच त्यांचा फोटो समोर आला आहे.

Deepika Ranveer Wedding: Photos of Sinddhi and Kokani Wedding | Deepika Ranveer Wedding : दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या लग्नातील फोटो आले समोर

Deepika Ranveer Wedding : दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या लग्नातील फोटो आले समोर

googlenewsNext
ठळक मुद्दे दीपिका व रणवीरचा विवाह सोहळा कोंकणी व सिंधी पद्धतीत पडला पार मुंबईत २८ नोव्हेंबरला पार पडणार रिसेप्शन


अभिनेत्री दीपिका पादुकोणरणवीर सिंग यांचा विवाह सोहळा कोंकणी व सिंधी पद्धतीत मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यातील फोटो पाहण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली होती. अखेर त्यांच्या अविस्मरणीय क्षण म्हणजेच लग्नातील फोटो समोर आले आहेत. हा विवाह सोहळा १४ व १५ नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये विवाह सोहळा पार पडला. गुरूवारी म्हणजेच १५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने सिंधी रितीरिवाजात पुन्हा एकदा विवाह केला. 

दीपिका व रणवीर त्यांच्या लग्नातील काही क्षण सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. 

गेल्या कित्येक दिवसापासून दीपिका पादुकोणरणवीर सिंग यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत.

बुधवारी १४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने व गुरूवारी १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. गुरूवारी त्यांनी आनंद कारज रिवाज देखील पूर्ण केली. आनंद कारजमध्ये चार फेरे घेतले जातात. ही विधी दिवसा केली जाते. पारंपारिक हिंदू लग्नात मुहूर्त, जन्मपत्रिका जुळणे महत्त्वाचे असते. मात्र आनंद कारजमध्ये या गोष्टींना तेवढे महत्त्व नाही. शीख धर्मात जे लोक गुरूवर पूर्ण विश्वास व श्रद्धा ठेवतात, तेच आनंद कारजची रितीरिवाज करतात. 

रिपोर्टनुसार दोघांचे फॅन लग्नाच्या फोटोचे मोठ्या आतुरतेने वाट पाहतायेत.  लवकरच दोघे आपल्या फॅन्ससाठी लग्नाचा फोटो शेअर करणार असल्याचे समजतेय. दीपिका व रणवीरने आपल्या लग्नाचे फोटो शेअर होऊ नयेत, यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. इटलीतील लेक कोमोमधील वेडिंग मेन्यूवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांच्या मोबाईल कॅमे-याला स्टिकर लावण्यापासून तर ड्रोनवर बंदी घालण्यापर्यंतचा सगळा चोख बंदोबस्त होता. 

दीपिकाला आवडणाऱ्या वॉटर लिलीच्या फुलांनी लग्नाचा मंडप सजवण्यात आला होता. मंत्रोच्चाराचे आवाज विलाच्या बाहेरही ऐकू येत होते. अद्याप दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आलेले नाहीत.बधुवारी लग्नाच्या वेळी दीपिकाने सब्यसाचीने डिझाइन केलेला लहंगा घातला होता. तर रणवीर सिंगने रणवीरचा एक पांढ-या शेरवानीतील फोटो लीक झाला आहे. या फोटोत रणवीर अगदी परफेक्ट दिसतो आहे. 
इटलीत विवाहसोहळा पार पडल्यानंतर दीपिका व रणवीरने मुंबईत २८ नोव्हेंबरला रिसेप्शनचे आयोजन केले आहे. जे रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. या रिसेप्शन पार्टीचे आयोजन रणवीर सिंगच्या आई-वडिलांनी केले आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबरला दीपिकाचे गाव बंगळुरूमध्ये स्वागत समारंभ पार पडणार आहे. ज्याचे आयोजन दीपिकाच्या आई वडिलांनी केले आहे. 

Web Title: Deepika Ranveer Wedding: Photos of Sinddhi and Kokani Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.