Deepika Ranveer Wedding Live Update : बॉलिवूडचे यंदाचे सर्वात मोठे लग्न...आज पती-पत्नी बनणार रणवीर-दीपिका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 11:31 IST2018-11-14T11:29:25+5:302018-11-14T11:31:51+5:30
बॉलिवूडचे सर्वात सुंदर जोडपे अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आज लग्नबंधनात अडकणार आहे. इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे हे रॉयल वेडिंग पार पडणार आहे.

Deepika Ranveer Wedding Live Update : बॉलिवूडचे यंदाचे सर्वात मोठे लग्न...आज पती-पत्नी बनणार रणवीर-दीपिका!!
बॉलिवूडचे सर्वात सुंदर जोडपे अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आज लग्नबंधनात अडकणार आहे. इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे हे रॉयल वेडिंग पार पडणार आहे. यंदाचे हे सर्वात मोठे लग्न आहे. यापूर्वी याच वर्षात सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचे लग्न झाले होते. सध्या दीपवीरचे डेस्टिनेशन वेडिंग एक ट्रेडिंग टॉपिक बनले आहे.
आज १४ आणि उद्या १५ नोव्हेंबरला हे लग्न होत आहे. कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने हा लग्नसोहळा रंगणार आहे.
मेहंदी सेरेमनीत भावूक झाली दीपिका
मेहंदी सेरेमनीत दीपिका चांगलीच भावूक झाली.हातावर मेहंदी लागताच दीपिका कमालीची भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी रणवीरने तिला सांभाळले आणि दीपिकाच्या ओठांवर पुन्हा हसू फुलले. सोशल मीडियावरच्या दीपवीरच्या फॅन पेजवर याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिल्यानुसार, मेहंदी सेरेमनीत दीपिकाच्या डोळ्यांत अचानक अश्रूंनी गर्दी केली. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. यावेळी रणवीर पुढे गेला आणि त्याने अलगद तिचे अश्रू टीपत तिला मिठीत घेतले. रणवीरने मिठीत घेताच दीपिका पुन्हा हसू लागली. दीपिका इमोशनल झाली त्यावेळी शुभा मुद्गल ठुमरीवर परफॉर्म करत होती.
असे केले पाहुण्यांचे स्वागत
लग्नसाठी इटलीत पोहोचलेल्या पाहुण्यांचे दीपवीरने खास स्वागत केले. लग्नात येणा-या प्रत्येकाला एक हस्तलिखित कार्ड देऊन स्वागत करण्यात आले. हे अनोखे स्वागत सगळ्यांनाच भावले.
अशी रंगली संगीत सेरेमनी
१३ नोव्हेंबरला रंगलेल्या संगीत सेरेमनीचे फोटो अद्याप आलेले नाहीत. पण या पार्टीत हर्षदीप कौर, शुभा मुद्गल अशा अनेकांनी गाणी सादर केलीत. हर्षदीपने या इव्हेंटमधील स्वत:चा फोटो शेअर केला. व्हॉट अ ब्युटीफुल डे, असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले. संगीत सेरेमनीत रणवीर फुल मूडमध्ये होता. त्याने दीपिकासाठी ‘गुंडे’मधील ‘तुने मारी एंट्री’ गायले. संगीत समारोहात सगळेच भारतीय पोशाखात होते. ‘मेहंदी है रचने वाली’, ‘काला शा काला’च्या स्वरांची धूम होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सेरेमनीत रणवीरने प्रचंड एन्जाूय केले. संगीत सेरेमनीत रोमॅन्टिक सॉन्ग, पंजाबी, सुफी गाणी वाजवली गेलीत.
लग्नाचा काढला वीमा
दिल्लीमधल्या एका विमा कंपनीकडून दोघांनी आॅल रिस्क पॉलिसी काढून घेतली आहे. १२ ते १६ नोव्हेंबर या काळात पार पाडणाºया या विवाहसोहळ्याला विम्याचे संरक्षण देण्यात आलेआहे. विमानप्रवास, भूकंप, चोरी, पूर,वादळ, आग यामुळं लग्नात अडथळा आल्यास या विम्याचेसंरक्षण मिळणार आहे.
एका दिवसाचे भाडे २४ लाख
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लेक कोमोतील रणवीर, दीपिका शिवाय पाहुणे जिथे थांबले आहेत, तिथले एका दिवसाचे भाडे सुमारे ४०० युरो म्हणजे जवळपास ३३ हजार रूपये आहे. याठिकाणी ७५ खोल्या आहेत. या हिशेबाने एका दिवसासाठी दीपवीर २४ लाखांवर खर्च करणार आहे. एक आठवड्यासाठी दोघांनाही १ कोटी ७३ लाखांवर रक्कम मोजावी लागणार आहे.
१६ नोव्हेंबरपर्यंत लेक कोमोमध्येचं मुक्काम
दीपिका व रणवीर दोघेही १६ नोव्हेंबरपर्यंत लेक कोमोमध्ये राहू शकतात. कारण विम्याचा कालावधी १२ ते १६ नोव्हेंबरपर्यंत आहे.
हनीमूनचा नाही प्लान
लग्नानंतर रणवीर दीपिका दीर्घकाळ हनीमूनवर जाऊ शकणार नाही. कारण लग्नानंतर लगेच रणवीर त्याचा आगामी चित्रपट ‘सिम्बा’च्या प्रमोशनमध्ये बिझी होणार आहेत.