Deepika Ranveer Wedding: फोटो पाहून बदलला करण जोहरचा मूड, फोटोंना दिलेली कमेंट होत आहे व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 13:36 IST2018-11-21T13:31:47+5:302018-11-21T13:36:38+5:30
आजवर करणने लग्न करणारच नाही असं बऱ्याचदा म्हटलं होतं. मात्र त्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याने करणचे फॅन्स खूश झाले आहेत.

Deepika Ranveer Wedding: फोटो पाहून बदलला करण जोहरचा मूड, फोटोंना दिलेली कमेंट होत आहे व्हायरल
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह इटलीत रेशीमगाठीत अडकलेत. लग्नबंधनात अडकल्यानंतर ५ दिवसांनी ‘दीपवीर’ने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससह शेअर केले. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची जितक्या आतुरतेने फॅन्स वाट पाहत होते तितकीच उत्कंठा बॉलीवुडच्या कलाकारांनाही होती. ‘दीपवीर’चे फोटो समोर आल्यानंतर फॅन्ससह बॉलीवुडच्या दिग्गज सेलिब्रिटींनीकडूनही कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. मात्र सध्या बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने या फोटोवर दिलेली कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो पाहून रणवीरचा मूड बदलला की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. उफ्फ, मलाही आता लग्न करायचे आहे अशी कमेंट करणने दीपवीरच्या एका फोटोला दिली आहे.
आजवर करणने लग्न करणारच नाही असं बऱ्याचदा म्हटलं होतं. मात्र त्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याने करणचे फॅन्स खूश झाले आहेत. करण जोहरने लग्न केले नसलं तरी तो सरोगसीच्या माध्यमातून तो पिता बनला आहे. त्याच्या मुलाचं नाव यश जोहर तर लेकीचं नाव रूही जोहर असं आहे. करणने आपल्या जुळ्या मुलांचा वाढदिवस ८ फेब्रुवारीला साजरा केला होता.
दीपिकाचे होमटाऊन बेंगळुरु येथे दीपवीरचे ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित केले आहे. या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी दीपवीर कालच बेंगळुरू येथे पोहोचले. बेंगळुरू विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. बेंगळुरूमधील दीपिकाचे घर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नवदांम्पत्याच्या स्वागतासाठी कुठलीही कसर सोडण्यात आलेली नाही, हेच या फोटोंवरून दिसते.दीपिकाचे होमटाऊन बेंगळुरु येथे दीपवीरचे ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित केले आहे. या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी दीपवीर कालच बेंगळुरू येथे पोहोचले. बेंगळुरू विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. बेंगळुरूमधील दीपिकाचे घर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नवदांम्पत्याच्या स्वागतासाठी कुठलीही कसर सोडण्यात आलेली नाही, हेच या फोटोंवरून दिसते.