Deepika Ranveer Wedding : दीपिका पादुकोणच्या घरी सुरू झालेत लग्नाचे विधी, पाहा पहिला फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 14:21 IST2018-11-02T14:19:38+5:302018-11-02T14:21:12+5:30
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४-१५ तारखेला लग्नबंधनात अडकणार आहेत आणि या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत.

Deepika Ranveer Wedding : दीपिका पादुकोणच्या घरी सुरू झालेत लग्नाचे विधी, पाहा पहिला फोटो!!
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४-१५ तारखेला लग्नबंधनात अडकणार आहेत आणि या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. होय, दीपिकाच्या बेंगळुरूस्थित घरी दीपिकाच्या लग्नापूर्वी नंदी पुजेचे आयोजन केले होते. याचे काही फोटो समोर आले आहेत. बेंगळुरूमधील सुप्रसिद्ध नंदी मंदिरातील ब्राह्मणांच्या हस्ते ही पूजा केली जाते. या पूजेत भावी वधूला काचेचा चुडा चढवला जातो. त्यानुसार, दीपिकालाही काचेचा चुडा चढवला गेला. लग्न होईपर्यंत वधूने हा काचेचा चुहा हातातून काढायचा नसतो.
एका फोटोत दीपिका पुजेत बसलेली दिसतेय आणि दुसऱ्या फोटोत आपल्या मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसतेय. दीपिकाची स्टाईलिस्ट शलीना नतानीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.
‘एक नवी सुरूवात, तुला खूप सारे प्रेम. आता फार काळ प्रतीक्षा करवत नाही. जगातील सर्वाधिक आनंदाच्या क्षणांवर तुझा हक्क आहे,’असे शलीनाने म्हटले आहे. या फोटोत दीपिका पारंपरिक लूकमध्ये दिसते आहे. आॅरेंज कलरचा सलवार, कुर्ता आणि त्याला साजरे कानातील मोठे एअररिंग्स तिचे सौंदर्य खुलवत आहेत.
दीपिका व रणवीर इटलीच्या लेक कोमो येथे लग्न करणार असे मानले जात आहे, अर्थात अद्याप याबाबतची घोषणा झालेली नाही. या ड्रिम वेडिंगमध्ये केवळ ३० खास पाुहण्यांना बोलवण्यात आले आहे.
ताजी चर्चा खरी मानाल तर हे लग्न कलर कॉर्डिनेटेड असेल. म्हणजेच या लग्नात केवळ कुटुंबीयांनाच नाही तर वेटरला सुद्धा ड्रेस कोडचे पालन करावे लागेल. या लग्नासाठी शेफसोबतही एक लेखी करार करण्यात आला आहे. त्यानुसार, या लग्नात जी पक्वाने असतील ती अन्य कुठेही कधीही बनवली जाणार नाही. साहजिकच या लग्नातील डिशेस अतियश खास असतील.
तामिळ आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा होणार असल्याचेही कळतेय.