मनीष मल्होत्रा नाही तर 'या' डिझायनरचा लेहंगा घालणार लग्नात दीपिका पादुकोण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 16:14 IST2018-08-23T15:56:07+5:302018-08-23T16:14:21+5:30

बॉलिवूडमध्ये सध्या 'बाँड बाजाबारात' वाला सीझन चालू आहे. प्रियांका चोप्रा- निक, दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांच्या लग्नाची तयारी सध्या जोराता सुरु आहे.

Deepika Padukone Will Wear SabhyaSachi Lehenga In Her Wedding | मनीष मल्होत्रा नाही तर 'या' डिझायनरचा लेहंगा घालणार लग्नात दीपिका पादुकोण

मनीष मल्होत्रा नाही तर 'या' डिझायनरचा लेहंगा घालणार लग्नात दीपिका पादुकोण

ठळक मुद्दे सध्या दीपिकाच्या लग्नाची शॉपिंग सुरु आहे२० नोव्हेंबरला इटलीतील लोम्बामध्ये विवाह सोहळा होणार आहे

बॉलिवूडमध्ये सध्या 'बाँड बाजाबारात' वाला सीझन चालू आहे. प्रियांका चोप्रा- निक, दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांच्या लग्नाची तयारी सध्या जोराता सुरु आहे. नुकतीच प्रियांका आणि निकचा रोका झाला आहे तर दीपिका आणि रणवीरने सीक्रेट लग्नाचे प्लॉनिंग केले आहे. सध्या दीपिकाच्या लग्नाची शॉपिंग सुरु आहे. याच दरम्यान दीपिकाच्या लेहंग्याची बाबती माहितीसमोर आलीय.  काही दिवसांपूर्वी दीपिका एका ज्वेलरी शॉपमध्ये शॉपिंग करताना दिसली होती. चर्चा आहे की दीपिका लग्नात सब्यसाचीने डिझायन केलेला लेहंगा घालणार आहे.  एका चॉट शोमध्ये दीपिकाला मनीष मल्होत्रा आणि सब्यसाचीमध्ये तू कोणाचा लेहंगा घालणं पसंत करशील यावर तिने सब्यसाची नाव घेतले होते. 


येत्या २० नोव्हेंबरला इटलीतील लोम्बा येथे असणाऱ्या लेक कोमो या नयनरम्स ठिकणी ‘दीप-वीर’चा  शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. तूर्तास दीपिका व रणवीर दोघेही लग्नाबद्दल पूरेपूर गोपनियता बाळगून आहेत. हा लग्नसोहळा अतिशय खासगी व्हावा,असा त्यांचा प्रयत्न आहेत आणि यामुळे हे लग्न भारतात न होता इटलीत होणार आहे.  ‘दीप-वीर’चा हा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. तूर्तास दीपिका व रणवीर दोघेही लग्नाबद्दल पूरेपूर गोपनियता बाळगून आहेत. हा लग्नसोहळा अतिशय खासगी व्हावा,असा त्यांचा प्रयत्न आहेत आणि यामुळे हे लग्न भारतात न होता इटलीत होणार आहे. याशिवाय या जोडप्याने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. होय, ‘दीप-वीर’च्या लग्नात मोबाईल बॅन असणार आहे. 

Web Title: Deepika Padukone Will Wear SabhyaSachi Lehenga In Her Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.