'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’च्या सीक्वलमध्ये दिसणार दीपिका पादुकोण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 15:13 IST2017-06-13T09:43:05+5:302017-06-13T15:13:05+5:30
दीपिका पादुकोण हॉलिवूड चित्रपट xxx सीरिजच्या आगामी चित्रपट xxx4 मध्ये सुद्धा काम करणार आहे. याची माहिती दिग्दर्शक डी जे ...

'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’च्या सीक्वलमध्ये दिसणार दीपिका पादुकोण
द पिका पादुकोण हॉलिवूड चित्रपट xxx सीरिजच्या आगामी चित्रपट xxx4 मध्ये सुद्धा काम करणार आहे. याची माहिती दिग्दर्शक डी जे कारुसोने ट्विटरवरुन दिली आहे. चित्रपटाची कथा आणि शूटिंगच्या टेड संदर्भात मी पुढच्या आठवड्यात मीटिंग करणार आहे. यावर दीपिकाच्या फॅन्सने दीपिका xxx4 मध्ये असणार का असा प्रश्न त्याला विचाराला यावर त्यांना हो असे उत्तर दिले आहे.
दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाने 'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’ जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. भलेही भारतात हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसला तरी या चित्रपटाने 308 मिलियन डॉलर पेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटाने जॅकी चैनच्या कुंग फू योगा पेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटातील दीपिका आणि विन डिझेलची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. 'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’मधले दीपिकाचा लूक ही चांगलाच पसंतीस पडला होता. या चित्रपटाचा प्रमोशनसाठी दीपिकाने विन डिझेलला 2 दिवस भारतात ही बोलवले होते.
सध्या दीपिका संजय लीला भंसालीच्या पद्मावती च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारते आहे. तिच्यासह या चित्रपटात रणवीर सिंग आणि शाहिद कपूरची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात रणवीर अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पद्मावती आणि बादशाह अलाउद्दीन खिल्जी यांच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. पद्मावतीच्या शूटिंग दरम्यान रणवीर सिंग एकाद सेटवर जखमी सुद्धा झाला होता. सेटवर प्राथमिक उपचार घेऊन रणवीरने आधी शॉट ओके केला आणि नंतर तो रूग्णालयात गेला.