‘पद्मावती’ वादापासून दूर आई उज्ज्वलासोबत लंडनला रवाना झाली दीपिका पादुकोण, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 22:12 IST2017-12-08T16:42:21+5:302017-12-08T22:12:21+5:30

बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण गुरुवारी मुंबई विमानतळावर बघावयास मिळाली. गेल्या काही दिवसांपासून दीपिका तिच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटामुळे ...

Deepika Padukone, who went away with 'Ujjwala' from 'Padmavati' debate, see photos! | ‘पद्मावती’ वादापासून दूर आई उज्ज्वलासोबत लंडनला रवाना झाली दीपिका पादुकोण, पहा फोटो!

‘पद्मावती’ वादापासून दूर आई उज्ज्वलासोबत लंडनला रवाना झाली दीपिका पादुकोण, पहा फोटो!

लिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण गुरुवारी मुंबई विमानतळावर बघावयास मिळाली. गेल्या काही दिवसांपासून दीपिका तिच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या वादामुळे दीपिकाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच दीपिकाने चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारल्याने तिच्यावर सर्वत्र सडकून टीका केली जात आहे. या सर्व वादाला वैतागलेल्या दीपिकाने आई उज्ज्वलासोबत लंडनला उड्डाण घेतले आहे. होय, गुरुवारी या दोघी मायलेकी लंडनला जात असताना विमानतळावर स्पॉट झाल्या. यावेळी दीपिकाच्या अवतीभोवती कडेकोड बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. 







यावेळी दीपिका कॅज्युअल लूकमध्ये बघावयास मिळाली. ‘पद्मावती’ला होणारा वाढता विरोध लक्षात घेता निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. परंतु काही कारणामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. त्याचबरोबर चित्रपट केव्हा रिलीज होणार हेदेखील अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे चित्रपट निर्माते लवकरच चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करतील असा अंदाज सध्या वर्तविला जात आहे. 







दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिकाने ‘पद्मावती’च्या प्रमोशनला सुरुवात केली होती. यासाठी ती सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. याव्यतिरिक्त तिने अनेक इव्हेंटमध्येही प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. परंतु चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने दीपिकाने प्रमोशन करणे थांबविले आहे. दरम्यान, दीपिका या सर्व वादापासून दूर जात काही काळ परिवारासमवेत सुट्या एन्जॉय करणार आहे. 

Web Title: Deepika Padukone, who went away with 'Ujjwala' from 'Padmavati' debate, see photos!