​दीपिका पादुकोण ठरली आशियातली सर्वांत सेक्सी महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 19:12 IST2016-12-08T19:12:44+5:302016-12-08T19:12:44+5:30

अभिनेत्री प्रियांका चोप्राला मागे टाकून दीपिका पादुकोण हिने एका खास अवॉर्डवर आपले नाव कोरले आहे. मागील दोन वर्षांपासून आशियातील ...

Deepika Padukone was the sexiest lady in Asia | ​दीपिका पादुकोण ठरली आशियातली सर्वांत सेक्सी महिला

​दीपिका पादुकोण ठरली आशियातली सर्वांत सेक्सी महिला

ong>अभिनेत्री प्रियांका चोप्राला मागे टाकून दीपिका पादुकोण हिने एका खास अवॉर्डवर आपले नाव कोरले आहे. मागील दोन वर्षांपासून आशियातील सर्वांत सेक्सी महिलेचा ताज प्रियांकाच्या डोक्यावर होता. २०१६ या वर्षीचा सेक्सिएस्ट अशिअन वूमन’चा अवॉर्ड दीपिका पादुकोण हिने पटकाविला आहे. ब्रिटेनच्या ‘इस्टर्न आय’ या वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी ‘अशिअन सेक्सिएस्ट वूमन’साठी दीपिकाला सर्वाधिक पसंती दिली आहे. 

‘इस्टर्न आय’ने केलेल्या पोल सर्वेक्षणात सर्वाधिक मते अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला मिळाली. तिने मागील वर्षी पहिल्या स्थानी असलेल्या प्रियांकाला पछाडले. या सर्वेक्षणात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. टीव्ही अभिनेत्रींनी जोरदार मुसंडी मारली असून ‘जवाई राजा’ या मालिके त रोशनी खुरानाचे पात्र साकारणारी निया शर्मा तिसºया स्थानी तर टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी चौथ्या स्थानवर आहे. आलिया भट्ट पाचव्या स्थानी आहे. 

sexiest asian woman in the world 2016 Niya Sharmaफोटो : निया शर्मा

sexiest asian woman in the world Dristi Dhami
फोटो : दृष्टी धामी

दीपिकासाठी 2016 हे वर्ष आनंदायी ठरले आहे. यावर्षी तिने हॉलिवूड अ‍ॅक्शन स्टार विन डिजेल याच्यासोबत ‘ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ झेंडर केज’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली असून लवकर तिचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आशियन सेक्सिएस्ट वूमन हा खिताब मिळाल्यावर दीपिका म्हणाली, यामुळे मला आनंद झाला आहे, मात्र वेगवेगळ्या लोकांसाठी सेक्सीचा अर्थ वेगळा असतो. माझ्यासाठी हा केवळ शारीरिक नाहीच. ज्यांच्यासोबत तुम्ही सहज आहात तेच सेक्सी आहे, आत्मविश्वास सेक्सी आहे, निरागसपणा व विन्रमता सेक्सी आहे. 

या यादीत सनाया इरानी (सहाव्या), कॅ टरिना कौफ (सातव्या), सोनम कपूर (आठव्या), माहिरा खान(नवव्या) व गौहर खान (दहाव्या)यांचाही समावेश आहे. या लिस्टमध्ये ३२ व्या स्थानी नीता अंबानीचे देखील नाव आहे. नीताला अ‍ॅडिटर चॉईस या यादीत स्थान मिळाले आहे. 

deepika padukone became sexiest asian woman in the world

Web Title: Deepika Padukone was the sexiest lady in Asia