सलमान खान दीपिका पादुकोणला करणार होता बॉलिवूडमध्ये लाँच, पण या कारणामुळे दीपिकाने दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 19:32 IST2020-06-12T19:31:39+5:302020-06-12T19:32:48+5:30

ओम शांती ओम या चित्रपटात दीपिकाने काम करण्यापूर्वी सलमानने तिला एका चित्रपटाची ऑफर दिली होती.

Deepika Padukone was offered her FIRST film in Bollywood by Salman Khan? | सलमान खान दीपिका पादुकोणला करणार होता बॉलिवूडमध्ये लाँच, पण या कारणामुळे दीपिकाने दिला होता नकार

सलमान खान दीपिका पादुकोणला करणार होता बॉलिवूडमध्ये लाँच, पण या कारणामुळे दीपिकाने दिला होता नकार

ठळक मुद्देदीपिकाने सांगितले आहे की, मला सलमानने सर्वप्रथम चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यावेळी मी वयाने खूपच लहान होती. त्यामुळे मी चित्रपटात यायला तयार नव्हते.

अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अपेक्षेनुसार कमाई केली नाही. पण चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचे मात्र सर्वांनीच कौतुक केले. लवकरच दीपिका पती रणवीर सिंगसोबत ‘83’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने या चित्रपटाची रीलिज डेट पुढे ढकलण्यात येईल असा अंदाज लावला जात आहे.

दीपिका पादुकोणने ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. या चित्रपटात तिची जोडी शाहरुख खानसोबत जमली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, दीपिका शाहरुख खानसोबत नव्हे तर सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. सलमान तिला बॉलिवूडमध्ये लाँच करणार होता. त्यामुळे त्याने तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर देखील दिली होती. पण दीपिकाने ती चक्क नाकारली होती.

दीपिकानेच पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, मला सलमानने सर्वप्रथम चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यावेळी मी वयाने खूपच लहान होती. त्यामुळे मी चित्रपटात यायला तयार नव्हते. त्याने मला त्याकाळात चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यामुळे मी नेहमीच त्याचे आभार मानते. आम्ही एकत्र काम करण्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहात आहोत. त्यामुळे काहीतरी खासच घेऊन आम्ही लोकांच्या भेटीस येऊ असे मला वाटते.

सलमान खान आणि दीपिका पादुकोण कधीच नायक-नायिका म्हणून कोणत्याही चित्रपटात एकत्र झळकले नाहीत. पण सलमानच्या मैं और मिसेस खन्ना या चित्रपटात दीपिका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात सलमान खान, सोहेल खान आणि करिना कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या.  

Web Title: Deepika Padukone was offered her FIRST film in Bollywood by Salman Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.