दीपिका पादुकोण म्हणते, आम्हाला मुलं आवडतात पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 13:48 IST2019-10-11T13:48:29+5:302019-10-11T13:48:54+5:30
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. दीपवीरच्या या लग्नाची कधी नव्हे इतकी चर्चा झाली. आता चर्चा होतेय ती दीपिकाच्या प्रेग्नंसीची.

दीपिका पादुकोण म्हणते, आम्हाला मुलं आवडतात पण...
ठळक मुद्देदीपिका व रणवीर सध्या दोघेही बिझी आहे. लवकरच हे पती-पत्नी ‘83’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. दीपवीरच्या या लग्नाची कधी नव्हे इतकी चर्चा झाली. आता चर्चा होतेय ती दीपिकाच्या प्रेग्नंसीची. होय, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगत आहे. दीपिकाने अनेक दिवसांपासून या चर्चांवर मौन बाळगले होते. पण आता खुद्द दीपिकाने प्रेग्नंसीच्या चर्चांवर मौन सोडले. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या प्रेग्नंसीच्या चर्चा आहेत. पण या सगळ्या अफवा असल्याचे ती म्हणाली.
‘ रणवीर आणि मी दीर्घकाळ एकमेकांना डेट करत होतो. साहजिकच आधी आमचे लग्न कधी होणार, याची लोकांना उत्सुकता होती. आता आम्हाला मुलं कधी होणार याची उत्सुकता आहे. त्यामुळेच माझ्या प्रेग्नंसीच्या अफवा ऐकून आम्हाला अजिबात आश्चर्य वाटले नाही. खरे तर आम्हा दोघांनाही लहान मुलं आवडतात. आम्हालाही मुलं हवी आहेत. पण सध्या तरी पालकत्वाची जबाबदारी घेण्यास आम्ही तयार नाही. तूर्तास आमचे संपूर्ण लक्ष करिअरवर आहे. अशात पालकत्व स्वीकारणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आम्ही अद्याप तरी याचा विचार केलेला नाही, असे दीपिकाने या मुलाखतीत सांगितले.
दीपिका व रणवीर सध्या दोघेही बिझी आहे. लवकरच हे पती-पत्नी ‘83’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे. यात रणवीर सिंग भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर दीपिका त्याच्या आॅनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल यांची पत्नी रोमी भाटियाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. याशिवाय दीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.