कल्की 2898 एडी'च्या सीक्वलमधून एक्झिट घेण्याआधी दीपिका पादुकोणनं केलेलं २० दिवसांचं शूटिंग, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:23 IST2025-09-25T18:22:41+5:302025-09-25T18:23:20+5:30
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आली आहे. तिला नुकतेच कल्की 2898 एडी'च्या सीक्वलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

कल्की 2898 एडी'च्या सीक्वलमधून एक्झिट घेण्याआधी दीपिका पादुकोणनं केलेलं २० दिवसांचं शूटिंग, पण...
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone सध्या चर्चेत आली आहे. तिला नुकतेच कल्की 2898 एडी'(Kalki 2898 AD)च्या सीक्वलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिकाने ७ तासांची शिफ्ट आणि मानधनात वाढ करण्याची मागणी आणि २५ लोकांच्या स्टाफची फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्याची मागणी केली होती. आता अशी माहिती समोर आली आहे की, दीपिकाने या सिनेमाचं २० दिवसांचं शूटिंगदेखील पूर्ण केले होते.
न्यूज १८ला दिलेल्या मुलाखतीत, दीपिकाने कल्की 2898 एडी'च्या सीक्वलचं २० दिवसांचं शूटिंग केले आहे. त्यानंतर तिने तिच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. प्रोडेक्शन हाऊसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "दीपिका पादुकोणने फी वाढवण्याची मागणी केली होती. तिला २५ टक्क्यांहून जास्त फी हवी होती. तिला विश्वास होता की तिच्या जागी दुसरे कोणी येऊ शकत नाही. पण, टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा व्यवस्थापनाने तिची मागणी पूर्ण केली नाही."
दीपिकाने केलेलं २० दिवसांचं शूटिंग पूर्ण
पुढे असेही सांगण्यात आलं की, "दीपिकाला सीक्वलबद्दल आधीपासूनच माहित होते. तिच्यासाठी ही भूमिका अभिनयाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण बनवली जात आहे, याची तिला जाणीव होती. तिने 'पार्ट २' साठी २० दिवसांचं शूटिंग आधीच पूर्ण केलं होतं. दिग्दर्शक नाग अश्विनने स्वतः याबद्दल सांगितलं होतं. तिचं पुढील शेड्यूल परस्पर संमतीने निश्चित केलं जाणार होतं. त्यामुळे, डेट क्लॅशचे दावे खरे नाहीत." दीपिका किंवा तिच्या टीमकडून या सर्व बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
'कल्कि'च्या निर्मात्यांनी केली होती घोषणा
'कल्कि २८९८ एडी'च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर दीपिका सीक्वलचा भाग नसल्याचे जाहीर केले होते. त्यांनी लिहिले होते की, "दीपिका पादुकोण आता 'कल्कि २८९८ एडी' च्या दुसऱ्या भागाचा हिस्सा नाही. आम्ही आमचे मार्ग वेगळे केले आहेत. पहिला चित्रपट बनवण्याच्या प्रदीर्घ प्रवासानंतर, आम्ही आता तिच्यासोबत भागीदारी करू शकत नाही. 'कल्कि' सारख्या चित्रपटाला मोठ्या कमिटमेंटची गरज आहे. आम्ही दीपिकाच्या चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो." मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिकाला यापूर्वी 'स्पिरिट' या चित्रपटातूनही काढण्यात आले होते.