दीपिका पादुकोणने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 10:55 AM2023-12-15T10:55:07+5:302023-12-15T11:01:35+5:30

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध अशा तिरुपती बालाजीच्या चरणी दीपिका नतमस्तक झाली. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

deepika padukone seeks blessings at tirupati balaji temple video viral | दीपिका पादुकोणने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, व्हिडीओ होतोय व्हायरल

दीपिका पादुकोणने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, व्हिडीओ होतोय व्हायरल

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका सध्या तिच्या आगामी 'फायटर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतंच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 'फायटर'च्या चर्चांदरम्यान दीपिका तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेली होती. आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध अशा तिरुपती बालाजीच्या चरणी दीपिका नतमस्तक झाली. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

तिरुपती बालाजी हे देशातील प्रसिद्ध असं देवस्थान आहे. भाविकांबरोबरच अनेक सेलिब्रिटीही तिरुपती बालाजीच्या दर्शनाला येत असतात. दीपिकानेही तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. एएनआयच्या ट्वीटरवरुन दीपिकाचा तिरुपती बालाजीच्या मंदिरातील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दीपिकाने यावेळी पारंपरिक लूक केला होता. सलवार, कमीज आणि ओढणीमध्ये दीपिका दिसून आली. 

दरम्यान, दीपिका 'फायटर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात ती स्क्वॉड्रन लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात हृतिक रोशन, अनिल कपूर, करणसिंह ग्रोव्हर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'पठाण' आणि 'वॉर'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी 'फायटर'चं दिग्दर्शन केलं आहे. २६ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: deepika padukone seeks blessings at tirupati balaji temple video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.