​ ‘या’ हॉलिवूड अभिनेत्यासोबत ‘लव्ह सीन्स’ द्यायलाही तयार आहे दीपिका पादुकोण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 10:24 IST2018-02-08T04:54:54+5:302018-02-08T10:24:54+5:30

‘पद्मावत’नंतर दीपिका पादुकोणला पुन्हा एकदा हॉलिवूडचे वेध लागल्याचे दिसतेय. होय, विन डिजेलसोबत ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ ...

Deepika Padukone is ready to give 'Love Scenes' with the Hollywood actor | ​ ‘या’ हॉलिवूड अभिनेत्यासोबत ‘लव्ह सीन्स’ द्यायलाही तयार आहे दीपिका पादुकोण!

​ ‘या’ हॉलिवूड अभिनेत्यासोबत ‘लव्ह सीन्स’ द्यायलाही तयार आहे दीपिका पादुकोण!

द्मावत’नंतर दीपिका पादुकोणला पुन्हा एकदा हॉलिवूडचे वेध लागल्याचे दिसतेय. होय, विन डिजेलसोबत ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा हॉलिवूड सिनेमा केल्यानंतर दीपिकाला पुन्हा एकदा हॉलिवूड खुणावू लागले आहे. पण आता विन नाही तर  दुस-याच एका हॉलिवूड अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची इच्छा दीपिकाने बोलून दाखवली आहे. केवळ कामचं नाही तर या अभिनेत्यासोबत लव्ह सीन देण्यासही ती तयार आहे. हा अभिनेता आहे, गोल्डन ग्लोब विजेता जेम्स फ्रांको. 
अलीकडे दीपिका नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये दीपिकाने हजेरी लावली. यावेळी नेहाने विचारलेल्या अनेक प्रश्नांना दीपिकाने दिलखुलास उत्तरे दिलीत. हॉलिवूडमध्ये कोणत्या अभिनेत्यासोबत लव्ह  सीन्स करायला आवडतील? असे दीपिकाला विचारण्यात आले, यावर दीपिकाने जेम्सचे नाव घेतले. 



जेम्स  फ्रांको हा हॉलिवूडचा लोकप्रीय अभिनेता व दिग्दर्शक आहे. त्याचे ‘वे द डिजास्टर आर्टिस्ट’, ‘स्पाईडरमॅन’ आणि ‘पाइनॅपल एक्स्प्रेस’ यासारखे  चित्रपट गाजले आहेत. वाद आणि जेम्स याचेही जवळचे नाते राहिले आहे. होय, गतकाळात  जेम्सवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता. पाच अभिनेत्रींनी जेम्सवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. अर्थात हे सगळे विसरून दीपिका जेम्ससोबत काम करण्यास तयार आहे. आता दीपिकाची ही इच्छा पूर्ण होते वा नाही, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

ALSO READ : ​तर काय रणवीर सिंग व दीपिका पादुकोणही निवडणार ‘विरूष्का’सारखा ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा पर्याय?

दीपिकाने नेहाच्या या शोमध्ये तिचे निकनेम काय, हेही सांगितले. लोक मला डीपी, दीपू आणि दीप्स सारख्या नावांनी बोलवतात, असे ती म्हणाली. 
दीपिकाचा अलीकडे आलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट चांगलाच गाजतोय. या चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा ओलांडल्याने दीपिका सध्या चांगलीच खूश आहे. या चित्रपटानंतर दीपिका ‘सपना दीदी’ या चित्रपटात दिसणार आहे. तूर्तास दीपिकाच्या लग्नाच्या चर्चांणाही उधाण आले आहे. दीपिका लवकरच रणवीर सिंगसोबत लग्न बंधनात अडकणार, अशी चर्चा आहे. दोघेही अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्यासारखे डेस्टिनेशल वेडिंग करणार, असेही म्हटले जात आहे.

Web Title: Deepika Padukone is ready to give 'Love Scenes' with the Hollywood actor