Deepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 15:28 IST2018-11-14T15:27:43+5:302018-11-14T15:28:33+5:30
दीपवीरच्या रिसॉर्टमध्ये एकूण ७५ रुम, ४ रेस्टॉरंट आणि बार आहेत. तसेच ४ काँन्फरस रुम, एक स्पा, इनडोर स्विमिंग पूल आहेत.

Deepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आज इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे काही वेळात विवाहबंधनात अडकणार आहेत. या शाही लग्नसोहळ्याच्या विधी सुरू झाल्या आहेत. नुकताच त्यांची मेहंदी आणि संगीत सेरेमनी रंगली. दोघांचे कोकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न होणार आहे. अशातच सोशल मीडियावर दीपवीरच्या रिसॉर्टमधील काही फोटो समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दीपवीरच्या रिसॉर्टमध्ये एकूण ७५ रुम, ४ रेस्टॉरंट आणि बार आहेत. तसेच ४ काँन्फरस रुम, एक स्पा, इनडोर स्विमिंग पूल आहेत. या रिसॉर्टच्या एका रुमची किंमत कमीत कमी ४०० यूरो म्हणजे भारतीय चलनानुसार ३३००० हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच ७५ रुमच्या पूर्ण हॉटेलची एक दिवसाची किंमत जवळपास २४,७५,००० रुपये आहे. जर तुम्ही या रिसॉर्टचे एका आठवड्यापर्यंतचे बुकिंग केले तर १,७३,२५,००० रुपये एवढी आहे.
दीपिका आणि रणवीरने हे रिसॉर्ट १७ नोव्हेंबरपर्यंत बुक केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर आपल्या लग्नात सीप्लेनने एन्ट्री करणार आहे. मुंबईत परतल्यानंतर २८ नोव्हेंबर २०१८ ला सायंकाळी ८ वाजता रिसेप्शन होणार आहे.
दीपवीर आपले लग्न अतिशय खासगी ठेवू इच्छितात. त्यामुळे याठिकाणचा एकही फोटो बाहेर येऊ नये, यासाठी लग्नस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अर्थात लग्नापूर्वी दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दोन्ही व्हिडिओत रणवीर धम्माल करताना दिसतो आहे.