​‘इंडियन एअरफोर्स’च्या प्रश्नपत्रिकेत दीपिका पादुकोण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 21:49 IST2016-08-31T14:14:03+5:302016-08-31T21:49:33+5:30

होय, इंडियन एअरफोर्सच्या नुकत्याच झालेल्या एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन अर्थात प्रवेश परीक्षेत अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्याबद्दलचा प्रश्न विचारला गेला. ...

Deepika Padukone in 'Indian Air Force' question paper | ​‘इंडियन एअरफोर्स’च्या प्रश्नपत्रिकेत दीपिका पादुकोण !

​‘इंडियन एअरफोर्स’च्या प्रश्नपत्रिकेत दीपिका पादुकोण !

य, इंडियन एअरफोर्सच्या नुकत्याच झालेल्या एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन अर्थात प्रवेश परीक्षेत अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्याबद्दलचा प्रश्न विचारला गेला. तुम्ही दीपिकाचे चाहते असाल तर तिच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला असणारच. पण विविध परीक्षांची तयारी करणाºया उमेदवारांना मात्र यापुढे दीपिकाबद्दलची खडा न् खडा माहितीही ठेवावी लागणार आहे. गत २८ आॅगस्टला एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन परीक्षा झाली. या परीक्षेत दीपिकाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘दीपिका पादुकोणने बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा फिल्म फेअर २०१६चा अवार्ड या चित्रपटासाठी जिंकला’, असा हा प्रश्न होता. उत्तरादाखल याचे पर्यायही दिले गेले होते. एका twitter युजरने या प्रश्नपत्रिकेची क्लिपिंग शेअर केली आहे. या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणजे ‘पीकू’. होय,‘पीकू’ या चित्रपटासाठी दीपिकाने यंदाचा फिल्मफेअर अवार्ड जिंकला होता.

Web Title: Deepika Padukone in 'Indian Air Force' question paper