स्टेडियममध्ये ‘या’ व्यक्तीशी लिप लॉक करताना दीपिका पादुकोण झाली कॅमेऱ्यात कैद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 17:20 IST2017-08-31T11:48:29+5:302017-08-31T17:20:24+5:30

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण सध्या तिच्या करिअरमध्ये आघाडीवर आहे. दमदार अभिनयाने तिला बी-टाउनमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवून दिले ...

Deepika Padukone imprisoned in camera while locking lip with 'this' person at the stadium | स्टेडियममध्ये ‘या’ व्यक्तीशी लिप लॉक करताना दीपिका पादुकोण झाली कॅमेऱ्यात कैद!

स्टेडियममध्ये ‘या’ व्यक्तीशी लिप लॉक करताना दीपिका पादुकोण झाली कॅमेऱ्यात कैद!

लिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण सध्या तिच्या करिअरमध्ये आघाडीवर आहे. दमदार अभिनयाने तिला बी-टाउनमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवून दिले आहे. खरं तर दीपिका पादुकोण सुरुवातीपासूनच तिच्या चित्रपटांपेक्षा रिलेशनशिपवरून अधिक चर्चेत राहिली आहे. कारण तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासूनच तिचे बºयाच अभिनेत्यांसोबत तसेच किक्रेटर आणि उद्योजकांसोबत नाव जोडले गेले आहे. ज्यामध्ये निहार पांड्यासह युवराज सिंग आणि विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्या यांचा समावेश आहे. मात्र सिद्धार्थ माल्यासोबतची तिचे रिलेशनशिप त्याकाळी चांगलीच चर्चेत आहे. त्यातही जेव्हा सिद्धार्थने दीपिकाला लाखो लोकांसमोर किस केले होते, तेव्हा ही जोडी चांगलीच चर्चेत आली होती. 


हा किस्सा २०११ चा आहे. जेव्हा आयपीएलमधील दोन संघ विजेतेपदासाठी आमने-सामने भिडले होते तेव्हा दीपिका सिद्धार्थसोबत स्टेडिअममध्ये आली होती. दीपिका बॉयफ्रेंड सिद्धार्थची टीम आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर बॅँगलोरला चीअर अप करण्यासाठी स्टेडिअममध्ये बसलेली होती. तर कोलकाता नाईट रायडर्स टीम आरसीबीला हरविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र ही मॅच अखेर आरसीबीनेच जिंकली होती. आपला संघ जिंकल्याचा आनंद दीपिका आणि सिद्धार्थला खूपच झाला होता. दोघांनाही विजयाचा आनंद कसा साजरा करावा, याचे भानच उरले नव्हते. 



दोघेही विजयाच्या आनंदाने एवढे वाहून गेले होते की, स्टेडिअममध्येच एकमेकांना किस करायला लागले. त्यावेळी सिद्धार्थ आणि दीपिकाचा हा लिप लॉक कॅमेºयांमध्ये कैदही झाला होता. परंतु आनंदाच्या भरात त्यांना याचे भान उरले नव्हते. यावेळी सिद्धार्थचे वडील विजय माल्या यांनीही हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी बघितला होता. पुढे दीपिका आणि सिद्धार्थच्या या लिप लॉकने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. पुढे हे दोघे बॉलिवूड आणि क्रिकेट इव्हेंटमध्ये एकत्र फिरायचे. त्यामुळे दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायचे. दोघे एकमेकांच्या एवढे प्रेमात होते की, ते लग्न करतील असेच काहीसे दिसत होते. परंतु काही दिवसांनंतर दोघांचे ब्रेकअप झाले. ही बाब बॉलिवूडसाठी धक्कादायक अशीच होती. 

Web Title: Deepika Padukone imprisoned in camera while locking lip with 'this' person at the stadium