‘या’ साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर बोल्ड अंदाजात झळकली दीपिका पादुकोण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 19:48 IST2017-06-01T14:17:50+5:302017-06-01T19:48:02+5:30
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचा सध्या सगळीकडेच डंका वाजत आहे. एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देत असलेल्या दीपिकाने हॉलिवूडमध्येही स्वत:ला सिद्ध केले आहे.
‘या’ साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर बोल्ड अंदाजात झळकली दीपिका पादुकोण!
ब लिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचा सध्या सगळीकडेच डंका वाजत आहे. एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देत असलेल्या दीपिकाने हॉलिवूडमध्येही स्वत:ला सिद्ध केले आहे. पहिल्याच ‘ट्रिपल एक्स : जेंडर केज’ या चित्रपटात तिने जगभरातील चाहत्यांना आपलेसे केले. शिवाय त्यावेळेस प्रमोशनदरम्यान ती जगभरात चर्चेतही राहिली. आता पुन्हा एकदा दीपिका चर्चेत आली असून, एका साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या फोटोत दीपिका खूपच हॉट अंदाजात बघावयास मिळत आहे.
‘मॅक्सिम’ साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर दीपिकाचा फोटो बघावयास मिळत आहे. फोटोमध्ये दीपिका खूपच हॉट अवतारात दिसत आहे. फोटोमध्ये दीपिकाने स्वप्नील शिंदे याने डिझाइन केलेला पांढºया रंगाचा टू-पीस सूट घातलेला आहे. फोटोमध्ये दीपिकाने दिलेली पोज चाहत्यांना आकर्षित करणारी ठरत आहे. या फोटोमध्ये दीपिका पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चेत आली आहे.
हॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर दीपिका बºयाचशा अवॉर्ड शोमध्ये बघावयास मिळाली आहे. ग्लोडन ग्लोब अवॉडर््समध्ये प्री आणि पोस्ट अशा दोन्ही कार्यक्रमांत दीपिकाचा जलवा बघावयास मिळाला होता. त्याव्यतिरिक्त कान्स फिल्म फेस्टीव्हल २०१७ च्या रेड कार्पेटवरही दीपिका बघावयास मिळाली होती. त्यावेळी दीपिकाच्या लुकचे सर्वत्र कौतुकही केले गेले.
दरम्यान, दीपिका सध्या तिच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवºयात सापडला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करीत आहे. चित्रपटात दीपिका व्यतिरिक्त अभिनेता रणवीर सिंग आणि शाहिद कपूर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.