लग्न असो वा मुंज रणवीर सिंगला करू शकता बुक, दीपिकाची घ्यावी लागणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 15:22 IST2019-10-31T15:20:59+5:302019-10-31T15:22:12+5:30
बॉलिवूडचा ‘एनर्जी किंग’ रणवीर सिंग सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टिव्ह असतो. दरवेळी रणवीर असे काही करतो की, हेडलाईनमध्ये येतो. आता हेच बघा ना, काल रणवीरने एक सेल्फी शेअर केला आणि या सेल्फीने रणवीर अचानक चर्चेत आला.

लग्न असो वा मुंज रणवीर सिंगला करू शकता बुक, दीपिकाची घ्यावी लागणार मदत
बॉलिवूडचा ‘एनर्जी किंग’ रणवीर सिंग सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टिव्ह असतो. दरवेळी रणवीर असे काही करतो की, हेडलाईनमध्ये येतो. आता हेच बघा ना, काल रणवीरने एक सेल्फी शेअर केला आणि या सेल्फीने रणवीर अचानक चर्चेत आला. आता या सेल्फीत असे काय खास? हा प्रश्न तुम्ही करणार. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर या सेल्फीसोबत रणवीरने लिहिलेल्या कॅप्शनवर एक नजर टाका. सध्या कॅप्शमुळेच रणवीरची ही पोस्ट व्हायरल होतेय.
अगदी सजूनधजून रणवीरने हा सेल्फी घेतलेला आहे. ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसतोय. पण त्याच्या या लूकपेक्षा या फोटोला त्याने दिलेले कॅप्शन अधिक खास आहे. होय, ‘लग्नसराई सुरु झालीय. हायर करण्यासाठी एंटरटेनर. लग्न, वाढदिवस, मुंज सर्वांसाठी मी तयार आहे....,’ असे रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
रणवीरने ही पोस्ट टाकली आणि काहीच क्षणात ती व्हायरल झाली. केवळ इतकेच नाही तर दीपिकानेही यावर मजेशीर कमेंट केली. ‘ रणवीरला हायर करण्यासाठी दीपिका पादुकोणशी संपर्क साधा,’ असे तिने लिहिले. आहे ना मजेशीर...
या पोस्टवर युजर्सनीच नाही तर सेलिब्रिटींनीही धम्माल कमेंट्स केल्या आहेत. अनुपम खेर, एकता कपूर, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर अशा अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातली अनुपम खेर यांची प्रतिक्रिया एकदम भन्नाट आहे. ‘इस फोटो में जो एक्सप्रेशन है, उसे देख के जो आपको बुलाएगा उसमे वाकई गट्स होंगे,’ असे अनुपम यांनी लिहिले आहे.