पहिल्याच भेटीत दीपिकासोबत रणवीरनं केलं असं काही, वाचून तुम्हाला येईल रणवीरचा राग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 16:36 IST2019-07-07T16:31:46+5:302019-07-07T16:36:53+5:30
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांमध्ये दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचादेखील समावेश आहे. या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात.

पहिल्याच भेटीत दीपिकासोबत रणवीरनं केलं असं काही, वाचून तुम्हाला येईल रणवीरचा राग
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांमध्ये दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचादेखील समावेश आहे. या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. दीपिका व रणवीरच्या लग्नाला एक वर्ष उलटली असतानाही त्यांच्या प्रेमात अजिबात फरक पडलेला नाही. ते दोघं लग्नानंतरही सोशल मीडियावर व इतर कुठेही एकमेकांबाबत प्रेम व्यक्त करताना दिसतात.
दीपिका पदुकोणने नुकतेच एका मुलाखतीत रणवीर सोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला. यावेळी दीपिकाने सांगितले की, आम्ही पहिल्यांदा सिंगापूरमध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये भेटलो होतो. त्यानंतर एक दिवस मी यशराज स्टुडिओमध्ये शूटिंग करत होते. त्यावेळी तिथे रणवीरही आला होता. तो माझ्याशी फ्लर्ट करत होता. त्याचवेळी तो दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता. तरीही माझ्यासोबत फ्लर्ट करत होता. शेवटी न राहवून मी त्याला विचारलं, तू माझ्याशी फ्लर्ट करतो आहेस का? त्यावर तो म्हणाला अजिबात नाही. त्यानंतर मी त्याला ठामपणे म्हणाले तू माझ्याशी फ्लर्ट करतो आहेस.’
पुढे दीपिका म्हणाली, ‘त्यानंतर आम्ही भन्साळींच्या घरी भेटलो. रामलीला सिनेमाच्या वेळी भन्साळींनी आम्हाला लंचसाठी बोलवलं होतं. त्यावेळी आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. तो असा वेळ होता जेव्हा मला रणवीर खूप खास वाटू लागला होता.
दीपिका व रणवीर रामलीला चित्रपटानंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकले आहेत. रणवीरने तर बऱ्याचदा ते दोघे भन्साळींमुळे एकत्र आल्याचं सांगितलं. दीपिका व रणवीरनं एकमेकांना सहा वर्षे डेट केल्यानंतर १४ नोव्हेंबर, २०१८ रोजी लग्न केलं.
लग्नानंतर आता ते दोघे ८३ चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट माजी क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर आधारीत आहे.
या चित्रपटात रणवीर कपिल देवची भूमिका साकारणार आहे आणि दीपिका कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या दोघांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.