वायुप्रदूषणाविषयी दीपिका पादुकोणने व्यक्त केली चिंता; वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 22:08 IST2017-08-23T16:38:37+5:302017-08-23T22:08:37+5:30

बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण हिने वायुप्रदूषण हे भविष्यातील एक गंभीर आव्हान असेल, असे म्हटले आहे. दीपिकाने म्हटले की, ...

Deepika Padukone expressed concern about air pollution; Read detailed! | वायुप्रदूषणाविषयी दीपिका पादुकोणने व्यक्त केली चिंता; वाचा सविस्तर!

वायुप्रदूषणाविषयी दीपिका पादुकोणने व्यक्त केली चिंता; वाचा सविस्तर!

लिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण हिने वायुप्रदूषण हे भविष्यातील एक गंभीर आव्हान असेल, असे म्हटले आहे. दीपिकाने म्हटले की, बहुतांश लोकांना इनडोर (घराच्या आत) वायुप्रदूषणाविषयीची माहितीच नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. रॉयल एटॉमस प्रोडक्टच्या एशियन पेंट्सचा प्रचार करीत असलेल्या दीपिकाच्या मते, ‘वायुप्रदूषण एक वास्तविक आणि गंभीर आव्हान आहे. बरेचशा लोकांना इनडोर वायुप्रदूषणाविषयी माहिती नाही. परंतु हे प्रदूषण तुमच्या आरोग्यास घातक ठरू शकते.’

दीपिकाने यावेळी असाही विश्वास व्यक्त केला की, ‘या अभियानाच्या माध्यमातून याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जावी, असे अपेक्षित आहे.’ या अभियानाविषयी माहिती देण्यासाठी आलेल्या दीपिकाने मास्क घातला होता. सध्या दीपिका रणवीर सिंगसोबत संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटामध्ये काम करीत आहे. चित्रपटात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. 

चित्रपटात दीपिका आणि रणवीर व्यतिरिक्त शाहिद कपूर याचीही प्रमुख भूमिका आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, त्यामध्ये ती व्यस्त आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दीपिका रणवीरसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. कारण यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगत असतानाच हे दोघे सातत्याने एकत्र बघावयास मिळत आहेत. त्यामुळे या दोघांचे ब्रेकअप झाले काय? याविषयी सांशकता निर्माण केली जात आहे. 

काही दिवसांपूर्वीच दीपिका रणवीरसोबत सीक्रेट डीनर डेटवर गेली होती. परंतु ही डेट सीक्रेट राहिले नसल्याने, हे दोघे अजूनही नात्यात असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, दीपिका ‘पद्मावती’ व्यतिरिक्त इतरही चित्रपटांमध्ये काम करीत आहे. तिच्याकडे हॉलिवूडच्याही काही प्रोजेक्टच्या आॅफर्स असल्याचे समजते. 

Web Title: Deepika Padukone expressed concern about air pollution; Read detailed!