'पठान'च्या सेटवर सिझलिंग लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, सेटवरील फोटो झाला लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 16:04 IST2022-03-16T16:04:09+5:302022-03-16T16:04:49+5:30
स्पेनमध्ये पठान (Pathaan Movie) चित्रपटाचे शूटिंग सुरू असून या चित्रपटाच्या सेटवरील शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone)च्या लूकचा फोटो लीक झालाय.

'पठान'च्या सेटवर सिझलिंग लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, सेटवरील फोटो झाला लीक
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या स्पेनमध्ये त्यांचा आगामी चित्रपट 'पठाण' (Pathaan Movie) चे शूटिंग करत आहेत. हा तोच अॅक्शन एंटरटेनर चित्रपट आहे ज्याद्वारे शाहरुख चार वर्षांहून अधिक काळानंतर थिएटरमध्ये दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. शूटिंगदरम्यानचे काही फोटो लीक झाले आहेत जे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. या फोटोंमध्ये दीपिका पादुकोण बिकिनीत सिझलिंग अवतारात दिसत आहे.
शाहरुख खानचे फोटोही येथे पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये तो वॉशबोर्ड अॅब्स दाखवताना दिसत आहे. यासोबतच नेटिझन्सनी चित्रपटाच्या सेटवरून दीपिकाचे फोटो समोर आले आहेत ज्यात ती बिकिनीमध्ये दिसत आहे. लीक झालेल्या फोटोंमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. शाहरुख-दीपिकाची हॉट केमिस्ट्री पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे लोक कमेंट बॉक्समध्ये म्हणत आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला 'पठाण'ची रिलीज डेट एका व्हिडिओद्वारे समोर आली आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाच्या बाबतीत सुरू असलेल्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. किंग खान २०२१ मध्ये अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मुंबईतील सेटवर दिसला होता.
२००७ मध्ये दीपिकाचा डेब्यू चित्रपट 'ओम शांती ओम', २०१३ मध्ये रोमँटिक-कॉमेडी 'चेन्नई एक्सप्रेस' आणि २०१४ मध्ये अॅक्शन-कॉमेडी 'हॅपी न्यू इयर'मध्ये यशस्वी कामगिरीनंतर 'पठाण'मध्ये शाहरूख आणि दीपिका ही जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. २०२३ मध्ये रिलीज होणारा हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत आहे, ज्याने २०१९ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' चित्रपट केला होता.