या कारणामुळे दीपिका पादुकोण-रणवीर सिंग इन्स्टाग्रामवर ठरले नंबर वन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 12:16 IST2018-10-30T11:52:18+5:302018-10-30T12:16:52+5:30
दीपिका-रणवीरने आपल्या लग्नाची तारीख इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवरून जाहीर केली. यामुळे सध्या दोघांचीही इंस्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रियता दिसून येते आहे.

या कारणामुळे दीपिका पादुकोण-रणवीर सिंग इन्स्टाग्रामवर ठरले नंबर वन!
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाविषयी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रात अनेक बातम्या गेल्या कित्येक महिन्यांपासून येत होत्या. त्यांचे लग्न कधी होणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. या सगळ्यांना पूर्णविराम देत दीपिका-रणवीरने आपल्या लग्नाची तारीख इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवरून जाहीर केली. यामुळे सध्या दोघांचीही इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रियता दिसून येते आहे.
अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 100 गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अग्रणी स्थानी आपली वर्णी लावली आहे. बॉलीवूडमधल्या ह्या बहूचर्चित जोडीच्या लग्नाची वाट त्यांचे चाहते खूप काळापासून पाहत होते आणि आपल्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवरून दीपिका-रणवीरने दिलेल्या सुखद वृत्तानंतर इन्स्टावर दीपिका-रणवीरच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल याविषयी सांगतात, दीपिका-रणवीरने इन्स्टाग्रामवरून आपल्या लग्नाची घोषणा केली. त्यांची ही पोस्ट सोशल मीडिया साईटवर बऱ्याच लोकांनी वाचली. तसेच लाइक आणि शेअर केली. ज्यामुळे त्यांच्या रँकिंगवर बराच फरक पडला आहे.
अश्वनी कौल पुढे सांगतात, आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश असतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”
रणवीरशिवाय अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खानसुद्धा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इन्स्टाग्राम रँकिंगमध्ये लोकप्रिय होते. तसेच दीपिकाशिवाय प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडीज आणि सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इन्स्टाग्राम रँकिंगवर पहिल्या पाच लोकप्रिय तारकांमध्ये होत्या.
दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांनी लग्नाच्या तारीखेची घोषणा केल्यामुळे ते इन्टाग्रामवर नंबर वन ठरले आहेत. त्यांच्या लग्नाची तर त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यामुळे आता पुढील काही काळ तरी ते नंबर एक वरच असतील अशी आशा करायला हरकत नाही.