जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 09:12 IST2025-09-30T09:11:59+5:302025-09-30T09:12:27+5:30
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शिक फराह खान यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलं आहे. त्यांच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चा आहेत.

जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शिक फराह खान यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलं आहे. त्यांच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चा आहेत. याच नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण दीपिकाच्या फॉलोविंग लिस्टमधून फराह खान गायब आहे. तर फराह खानने दीपिकासोबतच रणवीर सिंगलाही अनफॉलो केल्याचं दिसत आहे.
दीपिकाने फराह खानच्या ओम शांती ओम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासूनच त्यांच्याच चांगली मैत्री होती. पण, आता मात्र त्यांच्या मैत्रीत फूट पडल्याचं बोललं जात आहे. याचं कारण फराहने दीपिकाच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीवर केलेलं वक्तव्य असंही सांगितलं जात आहे. एका मुलाखतीत फराह म्हणाली होती की "५६ तास नॉनस्टॉप आणि ४८ तास न थांबता काम केलं. असं तापल्यावरच सोनं तयार होतं". याशिवाय फराहचा कूक दिलीपने एका व्लॉगमध्ये तिला विचारलं होतं की दीपिका पादुकोण शोमध्ये कधी येणार? त्यावर फराहने "दीपिका आता फक्त ८ तासच शूटिंग करते", असं उत्तर दिलं होतं.
यावरुनच दोघींच्या मैत्रीत बिनसल्याचं बोललं जात आहे. पण, याचं अद्याप नेमकं खरं कारण समोर आलेलं नाही. दीपिकासोबच फराहने रणवीरला अनफॉलो केलं आहे. मात्र रणवीर अजूनही फराहला फॉलो करत आहे.