दीपिका पादुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या 'गहराइयां'चा सगळीकडे बोलबाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 18:48 IST2022-02-03T18:48:00+5:302022-02-03T18:48:45+5:30
'गहराइयां' (Gehraiyaan)च्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

दीपिका पादुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या 'गहराइयां'चा सगळीकडे बोलबाला
सिद्धार्थ मल्होत्राचा शेरशाह (Shershah) हा २०२१ मधील ओटीटी प्लेटफॉर्म वरील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या उत्तुंग यशानंतर, प्रेक्षक आता धर्मा प्रॉडक्शनचा पुढील चित्रपट ’गहराइयां’ची (Gehraiyaan) वाट पाहत आहेत, जो ११ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जीवन, प्रेम, मैत्री, विश्वासघात आणि नातेसंबंधात असलेली गुंतागुंत दाखवतो.
’गहराइयां’च्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, त्यातील गाणी देखील चार्टबस्टर्सवर गाजताना दिसत आहेत. डूबें आणि शीर्षक गीत ’गहराइयां’ हे गाणे रिलीज झाल्या झाल्या लगेचच इंस्टाग्रामवर ट्रेंड करू लागले आणि बरेच जण रिल्स वर रील बनवत आहेत.
दीपिकाने दिले बोल्ड सीन्स
‘गहराइयां’ या चित्रपटात दीपिकाने कधी नव्हे ते इतके बोल्ड सीन्स दिले आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका बोल्ड भूमिकेत दिसते आहे. लग्नाआधी‘राम लीला’मध्ये तिने रणवीरसोबत किसिंग सीन दिला होता. त्यानंतर आता ‘डुबे’ या गाण्यात दीपिका सिद्धांतसोबत किसींग सीन देताना दिसते आहे. या एका गाण्यात ५ किसिंग सीन आहेत. ‘गहराइयां’ या चित्रपटात दीपिकाने अलिशाची भूमिका साकारली आहे. दीपिका व सिद्धांत शिवाय अनन्या यांच्यासोबतच धैर्य कारवा, नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.