​दीपिकाने विन डिझेलसोबत केली मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 15:34 IST2016-07-28T10:04:54+5:302016-07-28T15:34:54+5:30

‘ट्रिपल एक्स- द रिटर्न आॅफ झेंडर केज’ या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडपटात पदार्पण करणारी दीपिका पादुकोण विन डिझेलसोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे.

Deepika has fun with Vin Diesel | ​दीपिकाने विन डिझेलसोबत केली मस्ती

​दीपिकाने विन डिझेलसोबत केली मस्ती

्रिपल एक्स- द रिटर्न आॅफ झेंडर केज’ या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडपटात पदार्पण करणारी दीपिका पादुकोण विन डिझेलसोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे.  या चित्रपटामुळे सध्या ती प्रचंड चर्चेत आहे. दीपिका सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असून तिच्या चित्रपटांबद्दलच्या प्रत्येक घटनेच्या पोस्ट करत असतेच. सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या विविध पोस्ट्समुळे सिनेरसिकांमध्ये या चित्रपटाबाबत फारच उत्सुकता लागून राहिली आहे. याच उत्सुकतेत भर घालत दीपिकाने तिच्या फेसबुक पेजवर चित्रीकरणादरम्यानची तिच्या आणि विन डिझेलच्या धम्माल मस्ती करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न आॅफ झेंडर केज’हा चित्रपट पुढील वर्षी २० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Deepika has fun with Vin Diesel