​दीपिका महागली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 19:41 IST2016-07-28T14:11:14+5:302016-07-28T19:41:14+5:30

दीपिका पादुकोण सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे. बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर तर आहेतच शिवाय ‘ट्रिपल एक्स- द ...

Deepika expensive! | ​दीपिका महागली!

​दीपिका महागली!

पिका पादुकोण सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे. बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर तर आहेतच शिवाय ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न आॅफ झेंडर केज’ या चित्रपटाच्याद्वारे ती विन डिझेलसोबत हॉलिवूडमध्येही डेब्यू करतेय. या ‘डिमांड’ला ‘कॅश’ कसे करायचे हेही तिला चांगले कळतेय म्हणूनच तिने संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती‘साठी आपले मानधन वाढवून मागितले आहे. भन्साळींसोबत ती सलग तिसरा चित्रपट करीत आहे. रामलीला आणि बाजीराव-मस्तानी असे दोन चित्रपट तिने याआधी केले आहेत. पण, म्हणून काही भन्साळींना दीपिकाने मानधनाच्या बाबतीत सूट दिली नाही. याच चित्रपटासाठी दीपिकाची प्रतिस्पर्धी प्रियंका चोप्राही प्रयत्नरत होती. पण, अखेर बाजी दीपिकानेच मारली. आता पुन्हा कबीर खानचा नेक्स्ट प्रोजेक्ट असलेल्या ‘ट्युबलाईट’मध्येही ती सलमानसोबत झळकणार असल्याची बातमी आहे. म्हणजे...दीपिकाचे सध्या ‘दसो उंगलीया घी मे....’आहेत असे म्हणायला हरकत नाही तर?

Web Title: Deepika expensive!