म्हणे राखी सावंत माझ्या मुलाची आई होणार आहे...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 13:16 IST2019-09-01T13:13:22+5:302019-09-01T13:16:32+5:30

होय, आता त्याने काय करावे तर चक्क राखी माझ्या मुलाची आई होणार असल्याचा दावा केला आहे.

deepak kalal accused rakhi sawant and claimed she is pregnant with his child | म्हणे राखी सावंत माझ्या मुलाची आई होणार आहे...!

म्हणे राखी सावंत माझ्या मुलाची आई होणार आहे...!

ठळक मुद्देराखीने नुकतेच मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले.

राखी सावंत सध्या तिच्या सीक्रेट वेडिंगमुळे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, राखीच्या या सीक्रेट वेडिंगचा फायदा घेतोय तो दीपक कलाल.  लाईमलाइटमध्ये राहण्यासाठी तो राखीच्या लग्नाचा अगदी पूरेपूर वापर करतोय. आता दीपकने काय करावे तर चक्क राखी माझ्या मुलाची आई होणार असल्याचा दावा केला आहे.
होय, दीपक कलालने इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दीपकने राखी प्रेग्नंट असल्याचा दावा केला आहे. ‘राखी मेरा बच्चा तेरे पेट में पल रहा है. वो अपने पापा की बेइज्जती का बदला जरूर लेगा,’ असे या पोस्टमध्ये दीपक कलाल म्हणतोय.


राखी सावंतने एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले, ही बातमी उघड झाली, अगदी तेव्हापासून दीपक कलाल राखीबद्दल रोज नवी वादग्रस्त विधाने करतोय. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करून त्याने राखीवर आगपाखड केली होती. ‘राखी सावंत हे मंगळसूत्र पाहते आहेस ना. हेच ते मंगळसूत्र, जे संपूर्ण मीडियासमोर तू माझ्या गळ्यात बांधले होतेस आणि आता तू गुपचूप लग्न करून मोकळी झालीस. मी दीपक कलालशी लग्न करणार, असे मीडियासमोर तू म्हणाली होती. मी तुला 4 कोटी रूपये दिलेत. एक एक पैसा मोजून पोत्यात भरभरून दिलेत. ते पैसे तू खाल्लेत की गिळलेत. तू चार दिवसांत माझे पैसे परत केले नाहीस तर मी तुझे आयुष्य उद्धवस्त करेल,’असे दीपक कलाल या व्हिडीओत म्हणताना दिसला होता. या व्हिडीओवर राखीनेही उत्तर दिले होते. ‘आज तू माझ्या पतीविरोधात बोलला. मी एक पतिव्रता आहे. दीपक कलाल तू आत्तापर्यंत माझे चांगले रूप बघितले, माझे काली रूप बघितले नाही. तू पाताळात जा, मी तुला शोधून काढले आणि राधे माँच्या त्रिशूलाने तुझा वध करेल. अब तो मैं तेरा बँड बजाऊंगी,’ असे राखीने म्हटले होते.


राखीने नुकतेच मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले. आधी तिने ही बातमी नाकारली. माझ्या लग्नाची बातमी खोटी आहे. मी त्या हॉटेलात ब्राईडल फोटोशूटसाठी गेले होते, असे सांगून राखीने नेहमीप्रमाणे ‘ड्रामा’ केला. पण  शेवटी लग्न मी लग्न केले, अशी कबुली तिने दिली होती.

Web Title: deepak kalal accused rakhi sawant and claimed she is pregnant with his child