बॉक्स ऑफिसवर गाजतोय अजय देवगणचा 'दे दे प्यार दे २', जगभरात १०० कोटींचा टप्पा पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:12 IST2025-11-27T18:11:46+5:302025-11-27T18:12:09+5:30
सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आत्तापर्यंत अजय देवगणच्या या सिनेमाने किती कोटी कमावले, ते जाणून घेऊया.

बॉक्स ऑफिसवर गाजतोय अजय देवगणचा 'दे दे प्यार दे २', जगभरात १०० कोटींचा टप्पा पार
बहुचर्चित आणि ज्यांची प्रेक्षकांना उत्सुकता होती तो 'दे दे प्यार दे २' सिनेमा अखेर १४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 'दे दे प्यार दे' या सिनेमाच्या या सिक्वेलने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलं. आता सिनेमा प्रदर्शित होऊन तेरा दिवस झाले आहेत. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आत्तापर्यंत अजय देवगणच्या या सिनेमाने किती कोटी कमावले, ते जाणून घेऊया.
'दे दे प्यार दे' या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता याच्या सीक्वेलसाठीही चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी या सिनेमाने ८ कोटींची कमाई केली होती. तर वीकेंडलाही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. तर पहिल्या वीकेंडला 'दे दे प्यार दे २' ने तब्बल २५ कोटींचा गल्ला जमवला. पहिल्याच आठवड्यात सिनेमाने जवळपास ५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर सिनेमाच्या कमाईत घट दिसून आली होती. दुसऱ्या आठवड्यात वीकेंडला सिनेमाने ८.३५ कोटी कमावले. तर आत्तापर्यंत ६६.३५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात सिनेमाने १०२ कोटी कमावले आहेत.
'दे दे प्यार दे २' सिनेमात अजय देवगण, रकुलप्रीत सिंग, अर्जुन पांचाळ, तबू, आर माधवन, मीझान जाफरी, जावेद जाफरी, गौतमी कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अंशुल शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.