ज्येष्ठ सतारवादक पं. देबू चौधरी यांच्या पाठोपाठ झाले मुलाचे निधन, कुटुंबावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 15:19 IST2021-05-07T15:19:14+5:302021-05-07T15:19:31+5:30

पंडित देबू चौधरी यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे कोरोनामुळे निधन झाले.

Days after sitar maestro Debu Chaudhuri’s demise, son Prateek Chaudhuri dies | ज्येष्ठ सतारवादक पं. देबू चौधरी यांच्या पाठोपाठ झाले मुलाचे निधन, कुटुंबावर शोककळा

ज्येष्ठ सतारवादक पं. देबू चौधरी यांच्या पाठोपाठ झाले मुलाचे निधन, कुटुंबावर शोककळा

ठळक मुद्देप्रतीक यांच्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून आयसीयूत उपचार सुरू होते.

ज्येष्ठ सतारवादक पं. देबू चौधरी यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब कुठे सावरत असताना त्यांच्या मुलाचे देखील काल कोरोनाने निधन झाले.

पंडित देबू चौधरी यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांनी काल दिल्लीमधील गुरु तेग बहादुर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

प्रतीक यांच्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून आयसीयूत उपचार सुरू होते. सीतू महाजन कोहली यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी प्रतीक यांच्या निधनाच्या काही दिवस अगोदर काय घडले याविषयी लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘प्रतीक यांना त्यांचे वडील देबू चौधरी यांच्या शेजारी रुग्णालयात बेड हवा होता. वडिलांच्या निधनानंतर एका आठवड्यामध्येच प्रतीक यांचे निधन झाले. आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही.

Web Title: Days after sitar maestro Debu Chaudhuri’s demise, son Prateek Chaudhuri dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.