​शाहरुखचा ‘रईस’ येणार एक दिवस आधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 13:16 IST2016-12-07T11:05:13+5:302016-12-07T13:16:02+5:30

पुढील महिन्यात प्रचासत्ताक दिनाला प्रदर्शित होण्याऐवजी आता हा चित्रपट एक दिवस आधी म्हणजे २५ जानेवारीला रिलीज होणार आहे.

A day before Shahrukh's 'Raise' will come | ​शाहरुखचा ‘रईस’ येणार एक दिवस आधी

​शाहरुखचा ‘रईस’ येणार एक दिवस आधी

ा काही तासांमध्येच बहुप्रतिक्षीत ‘रईस’ चित्रपटाचा ट्रेलर दाखल होणार आहे. दस्तुरखुद्द शाहरुख चाहत्यांशी थेट संवाद साधणार असून देशभरातील सुमारे ३५०० स्क्रीन्सवर ट्रेलर दाखवण्यात येणार आहे. तत्पूर्वी एक रंजक बातमी आली आहे.

‘रईस’ची रिलीज डेट एका दिवासाने मागे घेण्यात आली असून पुढील महिन्यात प्रचासत्ताक दिनाला प्रदर्शित होण्याऐवजी आता हा चित्रपट एक दिवस आधी म्हणजे २५ जानेवारीला रिलीज होणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेलरमध्ये भरपूर अ‍ॅक्शन, डायलॉगबाजी आणि शाहरुखचा वनमॅन शो पाहायला मिळतो. चित्रपटात एक आयटम नंबरसुद्धा आहे. खास गोष्ट म्हणजे सनी लिओनीची झलक पाहायल मिळेल. म्हणजे एकूण काय तर मनोरंजनाचा संपूर्ण मसाला या ट्रेलरमध्ये आणि पर्यायाने चित्रपटात आहे. ट्रेलरच्या शेवटी प्रदर्शानाची तारीख २५ जानेवारी अशी सांगण्यात आली आहे.

यापूर्वी हृतिकच्या ‘काबील’ने प्रदर्शनाची तारीख २६ ऐवजी २५ जानेवारी केली आहे. दोन बिग बजेट चित्रपटांचा बॉक्स आॅफिस क्लॅश टळावा म्हणून रोशन कंपनीने हा निर्णय घेतला होता. मात्र, शाहरुखनेसुद्धा आता प्रदर्शन एक दिवस आधी करून टक्कर तर होणारच असा जणू हृतिकला इशाराच दिला आहे. दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी मिळून हा क्लॅश टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यामध्ये सहमती होऊ शकली नाही.

                                            

शाहरुखने एका स्पेशल व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले होते. आज (दि. ७) ‘रईस’चा ट्रेलर एकाच वेळी नऊ शहरात लाँच होणार असून त्यामध्ये  दिल्ली, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, जयपूर, मोगा पंजाब, इंदौर, अहमदाबाद या नऊ शहरांतील निवडक थिएटर्सचा समावेश आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शाहरूख उपस्थित प्रेक्षकांची बातचीत करणार आहे. 

प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणून धरण्यासाठी शाहरुखने चित्रपटाचे नवे पोस्टरसुद्धा शेअर केले आहे. पोस्टर ट्विट क रताना त्याने लिहिले की, आज ‘रईस’ का नया पोस्टर देखो... कल ट्रेलर देखनो को मिलेगा. अब  #अपनाटाईमशुरू.

आता हे अपना टाईम शुरू’ म्हणजे काय हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. पोस्टरमध्ये शाहरुख गँगस्टर रईस आलम म्हणून एकदम इंटेन्स आणि क्रुर दिसत आहे.

                                                    

ऐंशीच्या दशकातील कथानक असणाऱ्या ‘रईस’मध्ये शाहरुख दारू माफिया रईस आलमची भूमिका साकारत असून एक प्रामाणिक पोलिस अधिकारी एसीपी गुलाम पटेल जेव्हा त्याचे साम्राज्य उधळू पाहतो तेव्हा त्याच्याशी होणारा संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तो पोलिस अधिकारी म्हणजे नवाजुद्दिन सिद्दिकी.

Web Title: A day before Shahrukh's 'Raise' will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.