​संजय दत्तची मुलगी त्रिशाला बनली मान्यताची मैत्रिण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 16:21 IST2017-02-12T10:51:17+5:302017-02-12T16:21:17+5:30

संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. मान्यता न्यूयॉर्कमध्ये त्रिशाला दत्त हिला भेटणार अशी मध्यंतरी बातमी होती. ही बातमी अखेर खरी ठरली. मान्यता त्रिशालाला भेटली आणि दोघींनी एक क्यूट सेल्फिही काढली.

Daughter of Sanjay Daughter became a friend of recognition! | ​संजय दत्तची मुलगी त्रिशाला बनली मान्यताची मैत्रिण!

​संजय दत्तची मुलगी त्रिशाला बनली मान्यताची मैत्रिण!

जय दत्तची पत्नी मान्यता दत्त सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. मान्यता न्यूयॉर्कमध्ये त्रिशाला दत्त हिला भेटणार अशी मध्यंतरी बातमी होती. (आता ही त्रिशाला दत्त कोण, हे विचारू नका. त्रिशाला दत्त ही संजय दत्तची पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी.) ही बातमी अखेर खरी ठरली. मान्यता त्रिशालाला भेटली आणि दोघींनी एक क्यूट सेल्फिही काढली. ही सेल्फी मान्यताने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केली आहे."The lionesses living the night........New York times at its best #usa #dutts #funtime #love #grace #positivity #instagam #newyork #shenigans #girlsnight @trishaladutt.", असे कॅप्शन तिने यास दिले आहे. त्रिशालानेही तिच्या मम्मासोबतचा अर्थात मान्यतासोबचा एक फोटो शेअर केला आहे.



मान्यता व त्रिशालाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दोघीही जाम सुंदर दिसताहेत. केवळ एवढेच नाही तर हे फोटो दोघींमधल्या ‘हेल्दी’ नात्याचाही पुरावा आहे. संजयने मान्यताशी लग्नाचा निर्णय घेतला, तेव्हा त्रिशाला नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण कदाचित काळासोबत ही नाराजी दूर झालेली दिसते. मान्यता व त्रिशाला यांचे नाते दिवसागणिक अधिक घट्ट होताना दिसतेय. मान्यता व त्रिशालाची एकत्र सेल्फी त्याचा पुरावा आहे.





मान्यता ही संजयची तिसरी पत्नी आहे. १९८९मध्ये संजयने रिचा शर्मा हिच्याशी पहिले लग्न केले. रिचा व संजयला एक मुलगी झाली. ती त्रिशाला. रिचाचा ब्रेन ट्युमरमुळे १९९६ मध्ये मृत्यू झाला. तेव्हापासून त्रिशाला आपल्या आजी-आजोबांकडे अमेरिकेत राहते.  रिचाच्या मृत्यूनंतर १९९८ मध्ये संजयने रिया पिल्लई हिच्यासोबत दुसरा संसार थाटला. मात्र २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर २००८ मध्ये संजयने मान्यताशी तिसरा विवाह केला.
त्रिशाला कायम आपले हॉट व सेक्सी फोटो शेअर करताना दिसते. मध्यंतरी त्रिशाला बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार, अशीही चर्चा होती. अर्थात ही चर्चा केवळ चर्चाच ठरली.
  

Web Title: Daughter of Sanjay Daughter became a friend of recognition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.