'शोले'तील गब्बरसाठी 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती; एका कारणामुळे ऐनवेळी झाली अमजद खानची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 01:15 PM2023-11-07T13:15:36+5:302023-11-07T13:17:29+5:30

Amjad Khan: या भूमिकेसाठी प्रथम अमजद खान यांच्याऐवजी एका अन्य दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती.

danny-denzongpa-rejected-gabbar-role-in-sholay-1975 | 'शोले'तील गब्बरसाठी 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती; एका कारणामुळे ऐनवेळी झाली अमजद खानची निवड

'शोले'तील गब्बरसाठी 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती; एका कारणामुळे ऐनवेळी झाली अमजद खानची निवड

बॉलिवूडच्या इतिहासात अजरामजर ठरलेला सिनेमा म्हणजे शोले (shole) . अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), धर्मेंद्र (Dharmendra), जया बच्चन (Jaya Bachchan) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. किंबहुना आजही या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होते. या सिनेमातील मुख्य कलाकारांसोबत अन्यही काही भूमिका गाजल्या. त्यातलीच एक भूमिका म्हणजे गब्बर. अभिनेता अमजद खान यांनी ही भूमिका साकारुन तुफान लोकप्रियता मिळवली. परंतु, या भूमिकेसाठी प्रथम अमजद खान यांच्याऐवजी एका अन्य दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती.

'शोले'मध्ये अमजद खान (Amjad Khan)  यांनी वठवलेल्या गब्बर या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून घेतलं. त्यांच्या तोंडचे संवाद, त्याची स्टाइल सारखं काही लोकप्रिय झालं. मात्र, गब्बरची भूमिका अजरामर करणारा हा अभिनेता पहिली पसंती नव्हता.  त्याच्याऐवजी डॅनी डेन्जोंपा (danny denzongpa) यांची निवड करण्यात आली होती.

गब्बरच्या भूमिकेसाठी अमजद खान यांचा आवाज कमी भारदस्त असल्याचं जावेद अख्तर यांना वाटत होतं. त्यामुळे या सिनेमात डॅनी डेन्जोंगपाने काम करावं असं त्यांना वाटत होतं. परंतु, काही कारणास्तव डॅनीने या सिनेमासाठी नकार दिला. ज्यामुळे हा रोल अमजद खान यांच्या पदरात पडला.

दरम्यान, या सिनेमामध्ये मराठी अभिनेता विजू खोटे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे सुपरहिट ठरलेल्या या सिनेमासाठी प्रत्येक कलाकाराने अत्यंत किरकोळ मानधन घेतलं होतं.
 

Web Title: danny-denzongpa-rejected-gabbar-role-in-sholay-1975

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.