‘खतरनाक’ खलनायकाची ‘सुंदर’ पत्नी, ‘जयकांत शिखरे’च्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 07:49 AM2017-12-12T07:49:13+5:302017-12-12T13:19:13+5:30

सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि खतरनाक खलनायक कोण असा प्रश्न विचारल्यास सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेता प्रकाश ...

'Dangerous' villainy's 'beautiful' wife, you will be the wife of real life wife of 'Jayakant Shikhare'! | ‘खतरनाक’ खलनायकाची ‘सुंदर’ पत्नी, ‘जयकांत शिखरे’च्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा!

‘खतरनाक’ खलनायकाची ‘सुंदर’ पत्नी, ‘जयकांत शिखरे’च्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा!

googlenewsNext
्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि खतरनाक खलनायक कोण असा प्रश्न विचारल्यास सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेता प्रकाश राजचं. अभिनयाशी प्रकाश राजचा गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहे. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत प्रकाश राजने 'वॉन्टेड' सिनेमातून एंट्री केली. या सिनेमातील प्रकाश राजने साकारलेला खलनायक रसिकांना चांगलाच भावला. पहिल्याच हिंदी सिनेमातून त्याने रसिकांवर जादू केली. यानंतर सिंघम सिनेमातील जयकांत शिखरे तर रसिक विसरुच शकणार नाहीत. प्रकाश राजने साकारलेला जयकांत शिखरे रसिकांच्या मनात घर करुन गेला आहे. 26 मार्च 1965 रोजी कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये जन्म झालेला प्रकाश राज गेली अनेक वर्षे दाक्षिणात्य सिनेमात सक्रीय आहे. दूरदर्शनवरील मालिकेतून त्याला अभिनयाची संधी मिळाली होती. बॉलिवुड आणि दाक्षिणात्य सिनेमात अभिनेता साकारण्यासोबत दिग्दर्शक तसंच निर्माता म्हणूनही त्याने जबाबदारी पार पाडली आहे. हे तर झालं प्रकाश राजच्या व्यावसायिक जीवनाविषयी. मात्र त्याचं खासगी आणि वैयक्तीक जीवनही तितकंच सुंदर आहे. त्याच्या वैयक्तीक जीवनाच्या सुंदरतेचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची पत्नी पोनी वर्मा.गेल्या काही महिन्यांत पोनी वर्माच्या सौंदर्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.प्रकाश राज याची पहिली पत्नी ललिता कुमारी होती. 1994 साली त्याने ललिताशी लग्न केलं होतं. मात्र 2009 साली दोघांनी काडीमोड घेतला.यानंतर 2010 साली प्रकाश राजच्या जीवनात पोनी वर्माची एंट्री झाली आणि दोघांनी रेशीमगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला.पोनी वर्मा ही एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात पोनी वर्माने कोरिओग्राफर म्हणून जबाबदारी पार पडली आहे.पोनी वर्मा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.आपल्या पतीसह आकर्षक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटो पाहून तुम्हीही पोनीच्या सौंदर्यावर फिदा व्हाल. तिचे घायाळ करणारे सौंदर्य कमाल आहे असे शब्द तुमच्या ओठावर आपसुकच येतील. त्यामुळे रूपेरी पडद्यावर खलनायकाच्या रूपात झळकणारा प्रकाश राज पेक्षा सोशल मीडियावर त्याची पत्नी पोनी वर्माच जास्त हिट असल्याचे पाहायला मिळत आहे.








Web Title: 'Dangerous' villainy's 'beautiful' wife, you will be the wife of real life wife of 'Jayakant Shikhare'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.