Dadasaheb Phalke Award 2023 : 'गंगूबाई' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर 'ब्रम्हास्त्र'साठी रणबीरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 09:11 IST2023-02-21T09:09:33+5:302023-02-21T09:11:52+5:30

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते.  

Dadasaheb Phalke Award 2023 held in mumbai alia and ranbir kapoor wins best actors award | Dadasaheb Phalke Award 2023 : 'गंगूबाई' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर 'ब्रम्हास्त्र'साठी रणबीरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

Dadasaheb Phalke Award 2023 : 'गंगूबाई' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर 'ब्रम्हास्त्र'साठी रणबीरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

Dadasaheb Phalke Award 2023 : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते.  या महोत्सवात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सिनेमा क्षेत्रातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारावर अभिनेत्री आलिया भट(Alia Bhat) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या सर्वांच्या लाडक्या जोडीने नाव कोरले आहे. आलिया भटला 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर रणबीर कपूरला 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमातील 'शिवा' भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमात आलियाने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. सिनेरसिकांकडून आणि क्रिटिक्सकडूनही तिचे कौतुक झाले होते. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच सिनेम रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आलियाच्या याच भूमिकेची दखल घेत तिला महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गोरवण्यात आले. तर दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूरने 'ब्रम्हास्त्र' सिनेमातील त्याने साकारलेल्या शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. आलिया रणबीर या खऱ्या आयुष्यातील पॉवर कपलने महत्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरले. चाहत्यांकडून आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून दोघांवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

आलिया भटने इन्स्टाग्रावर अवॉर्ड मिळाल्याचा छान सेल्फी देखील शेअर केला आहे. नेटवर्क असलेल्या व्हाईट साडीत आलियाचं सौंदर्य खुलून दिसत होतं. तर रणबीर कपूर कामानिमित्त मुंबईत नसल्याने आलियाने त्याच्यावतीने पुरस्कार स्वीकारला. 

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव काल मुंबईच्या ताज लॅंड्स एंड येथे पार पडला. या सोहळ्यात रेखा, आलिया भट, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, रिषभ शेट्टी,रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्कीसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. 

Web Title: Dadasaheb Phalke Award 2023 held in mumbai alia and ranbir kapoor wins best actors award