अन् तहान-भूक विसरून ‘गोरी मॅम’च्या घराबाहेर ठाण मांडून बसला चाहता !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 08:50 IST2018-08-20T08:48:17+5:302018-08-20T08:50:52+5:30

टीव्हीवरचा लोकप्रीय कॉमेडी शो ‘भाबीजी घर पर है’ची ‘गोरी मॅम’ अर्थात सौम्या टंडनला अलीकडे एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे जागले. 

crazy fan threatened to harm himself who wants to meet saumya tandon |  अन् तहान-भूक विसरून ‘गोरी मॅम’च्या घराबाहेर ठाण मांडून बसला चाहता !!

 अन् तहान-भूक विसरून ‘गोरी मॅम’च्या घराबाहेर ठाण मांडून बसला चाहता !!

टीव्हीवरचा लोकप्रीय कॉमेडी शो ‘भाबीजी घर पर है’ची ‘गोरी मॅम’ अर्थात सौम्या टंडनला अलीकडे एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे जागले. एका चाहत्याने सौम्याला त्रासवून सोडले. सौम्याला भेटण्यासाठी हा चाहता खास भोपाळवरून मुंबईला आला आणि येथे येताच त्याने तिच्या बिल्डिंगबाहेर ठाण मांडले. सुरक्षारक्षकांनी त्याला तिथून हुसकावून लावण्याचे बरेच प्रयत्न केलेत, पण तो कुणालाही जुमानला नाही. मला सौम्याला भेटायचेय आणि नाही भेटू दिले तर मी माझ्या जीवाचे काही बरेवाईट करेल, अशी धमकी देणे त्याने सुरू केले. सौम्याच्या पतीलाही त्याने धमकावले, अलीकडे सौम्याने स्वत: हा किस्सा सांगितला.

 ‘तो भोपाळवरून आला होता. सकाळी सहा वाजता तो माझ्या बिल्डिंगच्या गेटसमोर येऊन उभा झाला. मी रात्री ८ वाजता घरी परतल्यावर गार्डने मला त्याच्याबदद्ल सांगितले. त्याने सकाळपासून काहीही खाल्लेले नाही, हेही त्याने मला सांगितले. मला एकटीने जावून त्याला भेटायचा धीर होईना.  मी बराच वेळ नवऱ्याची वाट पाहिली. तो घरी आला आणि मी त्याच्यासाठी जेवण घेऊन त्याला भेटायला गेले. मी भाबीजी घर पर है सोडणार, ही बातमी ऐकून तो बैचेन होता. मी त्याला  समजावले. आयुष्यात मोह टाळता आला पाहिजे, असे बरेच काही त्याला सांगितले आणि त्याला परत जाण्याची विनंती केली,’ असे सौम्या म्हणाली.
सौम्या लवकरच ‘भाबीजी घर पर है’ हा शो सोडणार आहे, यामुळे तिचे चाहते बिथरले आहेत. या शोने सौम्याला प्रचंड लोकप्रीयता दिली. चांगली फॅन फॉलोर्इंग दिली़ पण या चाहत्याच्या अशा वागण्याने सौम्या मनातून थोडी घाबरली आहे.  चाहत्यांना घराचा पत्ता, माझ्या घरचा फोन नंबर मिळतो तरी कसा, असा प्रश्न तिला पडला आहे.

Web Title: crazy fan threatened to harm himself who wants to meet saumya tandon