Corona Effect :पतीसह नुकतीच लंडनहून परतली ही अभिनेत्री स्वतःला केले लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 16:38 IST2020-03-18T16:38:18+5:302020-03-18T16:38:35+5:30

महानायक अमिताभ बच्चन यांनीही स्वत:ला आयसोलेशनचा मार्ग पत्करला आहे.

Cororna Effect: Sonam Kapoor decide to self-quarantine at their house-SRJ | Corona Effect :पतीसह नुकतीच लंडनहून परतली ही अभिनेत्री स्वतःला केले लॉकडाऊन

Corona Effect :पतीसह नुकतीच लंडनहून परतली ही अभिनेत्री स्वतःला केले लॉकडाऊन

कोरोना व्हायरसचा धोका सतत वाढत असताना सामान्य जनतेपासून तर बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच या व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी विलीगीकरणाचा मार्ग पत्करल्याचे चित्र आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही स्वत:ला आयसोलेशनचा मार्ग पत्करला आहे.कोरोनाही आजार 60 वर्षाहून अधिक वय असलेल्याना या पासून अधिक धोका असू शकतो. त्यामुळे  खबरदारी म्हणून दिलीप कुमार यांनाही एका बंद खोलीत ठेवण्यात आले आहे. तसेच भजनसम्राट अनुप जलोटा यांनीही नुकताच युरोप आणि लंडन दौरा केला होता. त्यामुळे त्यांनाही एका बंद खोलीत ठेवण्यात आल्याची माहिती खुद्द जलोटा यांनीच दिली होती. 

सोनम कपूरचा पती आनंद आहूजा हा लंडनमध्ये राहत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोनम पतीसह लंडनमध्येच होती. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे ती नुकतीच भारतात परतली आहे. परदेशातून आल्यामुळे कोरोनाचे संक्रमण होवू नये म्हणून तिने खबरदारी म्हणून स्वतःला एका बंद खोलीत लॉकडाऊन करून घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नसून सोनमही गरोदर असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे या आजाराची लागण होवू नये यासाठी तिन हे पाऊल उचलले असल्याची माहिती येत आहे.  


सध्या परदेशातून येणा-या प्रवाशांची अशाच प्रकारे तपासणी सुरु असून त्यांना काही दिवसांसाठी आयसोलेटेड एरियामध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे सोनम कपूरलाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अशा प्रकारे बंद खोलीत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया भट, अर्जुन कपूर, कॅटरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, दीपिका पादुकोण असे सगळे सेलिब्रिटींचे दर्शन काही दिवस दुर्मिळ होणार आहे.
 

Web Title: Cororna Effect: Sonam Kapoor decide to self-quarantine at their house-SRJ