OMG! लॉकडाऊन वाढल्याने वाढल्या आमिर खानच्या चिंता, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 12:47 IST2020-04-15T12:46:19+5:302020-04-15T12:47:45+5:30

वाचा सविस्तर

coronavirus outbreak aamir khan son junaid khan stuck in panchgani due to lockdown-ram | OMG! लॉकडाऊन वाढल्याने वाढल्या आमिर खानच्या चिंता, हे आहे कारण

OMG! लॉकडाऊन वाढल्याने वाढल्या आमिर खानच्या चिंता, हे आहे कारण

ठळक मुद्देजुनैद हा आमिर खानची पहिली पत्नी रिना दत्तापासून झालेला मुलगा आहे.

 कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉकडाऊन आहे. अशात बॉलिवूड स्टार्स सोशल मीडियावर कमालीचे अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. काही आपले फिटनेस व्हिडीओ शेअर करत आहेत. काही स्वत:च्या फॅमिलीसोबतचे तर काहीजण अनेक थ्रोबॅक फोटो शेअर करत आहेत. पण असे नाही की लॉकडाऊनमुळे सेलिब्रिटी चिंतीत नाही. मंगळवारी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढल्यावर सर्वाधिक चिंतीत झाला तो बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान. याचे कारण म्हणजे लेकाची चिंता.

होय, आमिरचा मुलगा जुनैद खान लॉकडाऊनमुळे अडकून पडला आहे. लॉकडाऊनची घोषणा होण्याआधी जुनैद आमिरच्या पाचगणीच्या बंगल्यात होता. लॉकडाऊनमुळे इतक्या दिवसांपासून तो तिथेच अडकून पडला. आता लॉकडाऊन वाढल्यामुळे जुनैदला 3 मेपर्यंत इथेच राहावे लागणार आहे.
जुनैद हा आमिर खानची पहिली पत्नी रिना दत्तापासून झालेला मुलगा आहे. जुनैदची एक बहीणही आहे. तिचे नाव इरा खान.

आमिर खानची  मुलंही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा होत्या. मात्र आमीरच्या मुलीने करिअरसाठी चित्रपटाऐवजी  नाट्यसृष्टीची निवड केली. 
मुलगा जुनैद यानेही रंगभूमीवरून अभिनयाचा श्रीगणेशा केला आहे. दोन्ही मुलांनी आपल्या हिमतीवर करिअर घडवायला सुरूवात केली आहे. अलीकडे एका मुलाखतीत आमिर यावर बोलला होता.

 ‘ माझ्या दोन्ही मुलांनी करिअर निवडताना  माझी मदत घेतली नाही, ते स्वत: यातून मार्ग काढत आहेत आणि वडिल म्हणून मला माझ्या दोन्ही मुलांचा अभिमान आहे. जुनैद बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सुक आहे. मात्र आम्हाला एका उत्तम स्क्रिप्टचा शोध आहे. मी जुनैदचे काम पाहिले आहे आणि मी त्याच्या कामावर खूश आहे. एक चांगली स्क्रिप्ट मिळताच जुनैदच्या चित्रपटावर काम सुरु होईल, असे आमिर एका मुलाखतीत म्हणाला होता. अर्थात आधी जुनैदला स्क्रिन टेस्ट द्यावी लागेल. त्यात तो पास झाला तरच त्याला चित्रपट मिळेल अन्यथा नाही. मी त्याला हे आधीच बजावले आहे, असेही आमिर म्हणाला होता.

Read in English

Web Title: coronavirus outbreak aamir khan son junaid khan stuck in panchgani due to lockdown-ram