CoronaVirus: बॉलिवूड निर्माते करीम मोरानींची दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट आली पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:57 IST2020-04-14T14:56:23+5:302020-04-14T14:57:03+5:30

करीम मोरानी यांना आहे हा आजार, त्यामुळे घ्यावी लागणार त्यांची जास्त काळजी

CoronaVirus : Bollywood producer Kareem Morani's second Corona test comes positive | CoronaVirus: बॉलिवूड निर्माते करीम मोरानींची दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट आली पॉझिटिव्ह

CoronaVirus: बॉलिवूड निर्माते करीम मोरानींची दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट आली पॉझिटिव्ह

बॉलिवूड निर्माता करीम मोरानी यांच्या दोन्ही मुली शजा आणि झोयाने कोरोनाचा यशस्वी सामना केला आहे. करीम यांच्या दोन्ही मुली बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. मात्र करीम यांंची दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या वृत्तामुळे घरात दहशतीचे वातावरण आहे. करीम मोरानी शाहरूख खानच्या जास्त जवळचे असून सर्वात आधी शजा मोरानीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.त्यानंतर दुसरी मुलगी जोआ मोरानीमध्येदेखील कोरोनाची लक्षण पहायला मिळाली आणि नंतर करीम यांची टेस्टदेखील पॉझिटिव्ह आली होती.

करीम मोरानी यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, करीम मोरानी यांची तब्येत ठीक नाही. मात्र अद्याप त्यांच्या तब्येतीबद्दल पूर्ण माहिती कोणालाच मिळू शकलेली नाही. खरेतर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटदरम्यान जेव्हा दोन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले जाते.

पहिल्यांदा जेव्हा मुलीची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते. त्यावेळी संपूर्ण कुटुंबाची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यात त्याची छोटी मुलगी आणि करीम या दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. शजा व झोयाची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पालिकेने त्यांचे संपूर्ण घर सील केले होते आणि घरातील 9 लोकांना क्वारंटाईन केले होते.

करीम यांची दुसरी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे कुटुंबातील सर्व जण चिंतेत आहेत कारण त्याचे वय साठहून जास्त आहे आणि हार्ट पेशंट आहे. यापूर्वी दोनदा हृदयविकाराचे झटके आले आहेत. तसेच बायपास सर्जरीदेखील झाली आहे.

करीम आणि शजा यांच्यामध्ये कोरोनाचे कोणतेच लक्षण नीट दिसले नव्हते. मात्र जोआमध्ये कोरोनाचे लक्षण स्पष्ट दिसत होते.हॉस्पिटलमधून जोआने इंस्टाग्रामवर संपूर्ण घडलेली कहाणी सांगितली होती.

Web Title: CoronaVirus : Bollywood producer Kareem Morani's second Corona test comes positive