'कुली नंबर 1'ला लागलेल्या आगीत मेकर्सचे झाले इतक्या कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 14:39 IST2019-09-18T14:35:47+5:302019-09-18T14:39:37+5:30

Coolie No 1 Movie : एका आठवड्या पूर्वी वरुण धवन आणि सारा अली खानचा आगामी सिनेमा कुली नंबर वनच्या सेटवर आग लागल्याची बातमीसमोर आली होती.

Coolie no 1 varun dhawan sara ali khan new movie loss due to fire | 'कुली नंबर 1'ला लागलेल्या आगीत मेकर्सचे झाले इतक्या कोटींचं नुकसान

'कुली नंबर 1'ला लागलेल्या आगीत मेकर्सचे झाले इतक्या कोटींचं नुकसान

काही दिवसांपूर्वी वरुण धवन आणि सारा अली खानचा आगामी सिनेमा कुली नंबर वनच्या सेटवर आग लागल्याची बातमी समोर आली होती. एका आठवड्या पूर्वी लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तीन तास लागले होते. या आगीच्या भक्ष्यस्थानी सेटचा एक हिस्सा आणि काही लाईटचे सामान आले आहे.  मेकर्सचे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.  

आजतकच्या रिपोर्टनुसार, सिनेमाच्या निर्मात्याचे जवळपास या आगीमुळे 2 ते 2.5 कोटींचं नुकसान झाले आहे. आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही. मात्र निर्मात्यांनी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी इन्श्युरन्स प्रकियेला देखील सुरवात केली आहे.


 १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'कुली नं-1' सिनेमात गोविंदा, करिष्मा कपूर, कादर खान आणि शक्ती कपूरसारख्या कलाकारांच्या भूमिका होत्या. या सिनेमाला रसिकांची तुफान पसंती मिळवली होती. आजही कुली नंबर 1 आठवताच गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्यामधील असलेली केमिस्ट्री आजही डोळ्यासमोर उभी राहते. इतके वर्ष ओलांडली असली तरीही कुली नंबर - सिनेमाची जादू कमी झालेली नाही. त्यामुळे आता सिनेमाचा सिक्वेल बनत असल्यामुळे तीच लोकप्रियता या सिक्वलला मिळेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे.


वरुण धावनच्या सिनेमाबाबत बोलायचे झाले तर तो, 'स्ट्रिट डान्सर 3 डी’मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबर २०१९ला प्रदर्शित होणार होता. पण मागच्याच महिन्यांत या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटचा खुलासा झाला होता. चित्रपटाची रिलीज डेट ८ नोव्हेंबरवरून पुढील वर्षी २४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. 

Web Title: Coolie no 1 varun dhawan sara ali khan new movie loss due to fire