तैमूर नावावरून उठले ‘वादंग’; टिवटरवर ‘खडाजंगी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 18:13 IST2016-12-21T18:13:48+5:302016-12-21T18:13:48+5:30

बॉलिवूडचं हॉट कपल सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांच्या बाळानं मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात जन्म घेतला. पतौडी ...

'Controversy' arose from the name of Timur; 'Khajjangi' on TV! | तैमूर नावावरून उठले ‘वादंग’; टिवटरवर ‘खडाजंगी’!

तैमूर नावावरून उठले ‘वादंग’; टिवटरवर ‘खडाजंगी’!

लिवूडचं हॉट कपल सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांच्या बाळानं मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात जन्म घेतला. पतौडी खानदान आणि कपूर कुटुंंबियांनी मिळून बाळाचे नाव ‘तैमूर अली खान’ असे ठेवले. सैफने लगेच त्याच्या नामकरणाची गोड बातमी चाहत्यांसोबत ट्विटरवर शेअर केली. मग काय? त्याला काहींच्या शुभेच्छा येऊ लागल्या तर ‘तैमूर’ या नावाला विरोध करत अनेकांचे टिवट्स धडकू लागले. विविध धार्मिक संस्था, सामाजिक संस्था तसेच अनेक व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरून या नावाला विरोध दर्शवत आहेत. या नावावरून चांगलेच वादंग माजल्याचे चित्र ट्विटरवर दिसतेय. या नावातून कथित होणाऱ्या  विविध अर्थांवर टिवटिवाट सुरू झालाय. पाहूयात, नेमकं काय आहे हा वाद-प्रतिवाद...

शालेय इतिहासात ‘तैमूर’ ची नोंद :
तैमूर हे नाव प्रत्येक भारतीयांनी त्यांच्या शालेय जीवनात अभ्यासले आहे. ‘तिमूर‘ आणि ‘तेमरलेन’ म्हणून ओळखला जाणारा मोगलाई क्रूर योद्धा. पर्शिया आणि मध्य आशियाच्या अनेक भागांवर त्याने आक्रमण करून ते भाग हस्तगत केले होते. १४ व्या शतकात त्याने दिल्लीवर अधिराज्य गाजवण्यासाठी हजारो भारतीयांच्या कत्तली केल्या. 

                                                

                                                 

‘पँडोरा बॉक्स’ मधून बाहेर आले ‘हे’ नाव :
 ग्रीक पौराणिक कथेनुसार, पँडोरा नावाच्या मुलीकडे एक बॉक्स असतो. ज्यात अनेक दुष्ट आत्मे असतात. तो बॉक्स उघडल्यास त्यातून बाहेर आलेले आत्मे पुन्हा परत जाऊ शकत नाहीत. त्याप्रमाणे तैमूर हे नाव आम्हाला पँडोरा बॉक्समधून कळाले असल्याचे सैफीनाचे म्हणणे आहे.
 
                                               

                                               

हिटलरपेक्षा वाईट नाव :

 आपल्या मुलाचं नाव कुणी हिटलर ठेवतं का? नाही ना.. तैमूर हे नाव हिटलरपेक्षा कित्येक पटीनं वाईट आणि क्रूर समजलं जातं. इस्त्राईल किंवा युरोपातही कुणी मुलाचं नाव हिटलर ठेवत नाही. ट्विटरवर अनेकांनी याविषयी ट्विट केलेले दिसतेय. 

                                                 

Web Title: 'Controversy' arose from the name of Timur; 'Khajjangi' on TV!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.