सैफशी लग्न करण्यापूर्वी करीना कपूरने ठेवली होती ही अट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 10:06 IST2018-02-08T04:36:21+5:302018-02-08T10:06:21+5:30

बॉलिवूडचा छोटे नवाब सैफ अली खान याची दोन लग्न झाली आहेत.पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंह हिच्याशी झालं होतं. त्या ...

This condition was made by Kareena Kapoor before Saif's marriage? | सैफशी लग्न करण्यापूर्वी करीना कपूरने ठेवली होती ही अट?

सैफशी लग्न करण्यापूर्वी करीना कपूरने ठेवली होती ही अट?

लिवूडचा छोटे नवाब सैफ अली खान याची दोन लग्न झाली आहेत.पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंह हिच्याशी झालं होतं. त्या लग्नावेळी सैफची दुसरी पत्नी करीना ही चिमुकली शाळकरी मुलगी होती.ती सैफच्या लग्नात त्या शुभेच्छा देण्यासाठी आली होती. त्यावेळी सैफला अंकल अंकल संबोधणारी हिच चिमुकली त्याच्याशी दुसरे लग्न करुन त्याची बेगम बनेल याची कल्पना त्यावेळी कुणीही केली नसेल.करीना कपूर हिचे आधी अभिनेता शाहिद कपूरवर प्रेम होते.दोघंही लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र कुठेतरी दोघांमध्ये बिनसले आणि ते वेगळे झाले.त्याचवेळी करीनाच्या आयुष्यात सैफची एंट्री झाली आणि दोघे प्रेमात पडले. दोघांच्या आगळ्यावेगळ्या लव्ह स्टोरीची बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु झाली.बराच काळ एकत्र घालवल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.शाहिदशी ब्रेकअप झाल्यानंतर 'टशन' सिनेमाच्या सेटवर सैफ करीना भेटले आणि दोघांतली जवळीक वाढू लागली.टशन सिनेमात सैफ,करीनासह अक्षयकुमारसुद्धा होता.त्यावेळी सैफचा स्वभाव बेबोला भावला.महिलांप्रती सैफच्या मनातील आदर पाहून ती त्याच्यावर लट्टू झाली.वयाने सैफ करीनापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. मात्र एकत्र लग्नाचा निर्णय घेतला त्यावेळी करीनाने सैफसमोर एक अट ठेवली होती.सैफ नवाबच्या घराण्यातून होता.सैफशी लग्न करुन करीना बेगम बनणार होती. त्यामुळे पैशाची तिला काही कमी नव्हती. मात्र लग्नानंतरही बॉलिवूडमध्ये काम करत राहणार अशी अट तिने सैफपुढे ठेवली.सैफने याला लगेचच होकार दिला आणि दोघे रेशीमगाठीत अडकले. दोघांचे धर्म वेगवेगळे होते. मात्र दोघांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात दोघांचे लग्न लावून दिलं. त्यांचे लग्न धुमधडाक्यात व्हावं अशी खान आणि कपूर कुटुंबीयांची इच्छा होती.मात्र सैफ आणि करीनाला लग्नात कुठलाही बडेजावपणा नको होता.हे लग्न साधेपणाने पार पडावं अशी सैफिनाची इच्छा होती.त्यामुळे लग्न धुमधडाक्यात करण्याचे दोन्ही कुटुंबीयांनी ठरवलं तर पळून जाऊन लग्न करण्याचा इशारा सैफिनाने दिला होता.दोघांच्या या धमकीनंतर दोघांचं लग्न साधेपणाने संपन्न झाले. दोघांनी कोर्टात लग्न केले आणि काही मोजक्या मंडळींनाच लग्नाचे निमंत्रण देण्यात आलं होतं.हीच होती दोघांच्या लग्नाची विचित्र अट.आता लग्नानंतर बेगम करीना एका मुलाची आई असून बॉलिवूडमध्येही ती काम करते आहे.यांत तिला सैफचा पूर्णपणे पाठिंबा आहे. 

Also Read:करिना कपूर म्हणे, आणखीन 20 वर्षे ती चित्रपटात काम करणार !

Web Title: This condition was made by Kareena Kapoor before Saif's marriage?