चित्रपटांमध्ये येण्याअगोदर अशी दिसायची परिणिती चोपडा, व्हिडीओ होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 21:41 IST2018-03-24T16:11:38+5:302018-03-24T21:41:38+5:30

आपल्या अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखली जाणारी परिणिती चोपडा चित्रपटांमध्ये कशी दिसायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ पाहा.

Before coming to the movies, this is the result of Chopra, the video is viral! | चित्रपटांमध्ये येण्याअगोदर अशी दिसायची परिणिती चोपडा, व्हिडीओ होतोय व्हायरल!

चित्रपटांमध्ये येण्याअगोदर अशी दिसायची परिणिती चोपडा, व्हिडीओ होतोय व्हायरल!

लिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या हृदयावर आधिराज्य गाजविणाºया अभिनेत्री परिणिती चोपडाच्या आयुष्याशी संबंधित एक मुख्य खुलासा झाला आहे. होय, चित्रपटांमध्ये येण्याअगोदर ती कशी दिसायची याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंत केला जात असून, अनेकांना परिणितीचा हा अवतार बघून आश्चर्य वाटत आहे. 

परिणितीने तिच्या करिअरची सुरुवात ‘इश्कजादे’ या चित्रपटातून केली. या चित्रपटाअगोदरचा तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये परिणिती टीनेजर दिसत आहे. हा व्हिडीओ जवळपास १३ वर्षांपूर्वीचा आहे. व्हिडीओमध्ये ती खूपच सिम्पल अंदाजात बघावयास मिळत आहे. 



या व्हिडीओबद्दल सांगायचे झाल्यास हा व्हिडीओ दूरदर्शन टीव्हीचा आहे. ज्यामध्ये परिणिती इतर मुलांसोबत ‘तन मन से अपने देश की सेवा करेंगे हम’ हे गाणे गाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये परिणिती दुसºया रांगेत नारंगी सूट परिधान करून दिसत आहे. 

दरम्यान, परिणिती नुकतीच ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. सध्या ती ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत बघावयास मिळणार आहे. या व्यतिरिक्त ती ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटातही अर्जुनसोबत काम करत आहे. 

Web Title: Before coming to the movies, this is the result of Chopra, the video is viral!