चित्रांगदा सिंग इटालियन अभिनेता मार्कोसोबत शेअर करणार स्क्रिन, फर्स्ट लूक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 12:40 PM2022-12-20T12:40:47+5:302022-12-20T12:59:47+5:30

वयाच्या 46 व्या वर्षीही चित्रांगदा सौंदर्याच्या बाबतीत आजच्या अभिनेत्रींनी टक्कर देते. सोशल मीडियावर फोटोंमुळे ती चर्चेत असते.

Chitrangada Singh to share screen with Italian actor Marco, first look out | चित्रांगदा सिंग इटालियन अभिनेता मार्कोसोबत शेअर करणार स्क्रिन, फर्स्ट लूक आऊट

चित्रांगदा सिंग इटालियन अभिनेता मार्कोसोबत शेअर करणार स्क्रिन, फर्स्ट लूक आऊट

googlenewsNext

‘ह जारो ख्वाहिशें ऐसी’पासून ‘साहेब बिवी और गँगस्टर ३’पर्यंतच्या प्रवासात नेहमीच विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारणारी चित्रांगदा सिंग लवकरच इटालियन कलाकारांसोबत झळकणार आहे. दिग्दर्शक गौतम घोष यांच्या आगामी इंडो-इटालियन चित्रपटात चित्रांगदा मुख्य भूमिकेत आहे. यात तिच्या जोडीला इटलीतील दिग्गज अभिनेते मार्कोडो लियोनार्डी आहेत. यानिमित्ताने चित्रांगदा प्रथमच इटालियन अभिनेत्यासोबत काम करत आहे. २०१९ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती; पण महामारीनं वाट अडवल्यानं शूट पूर्ण होऊ शकलं नव्हतं. आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. 

याचा एक मोठा भाग मुंबई आणि जबलपूरमध्ये शूट केला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिव्हील करण्यात आला आहे. यात चित्रांगदाचं डी-ग्लॅम रूप पाहायला मिळतं, जे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देणारं ठरत आहे. या पोस्टरवर कमीत कमी मेकअप केलेली ऑरेंज रंगाच्या साडीतील चित्रांगदा लक्ष वेधून घेते. या चित्रपटाची पटकथा गौतम यांनी जगन्नाथ गुहा यांच्या साथीनं लिहिली आहे. याशिवाय एमेडियो पगनीनी आणि सर्जियो स्कैपग्निनी या इटालियन लेखकांनीही यावर काम केलं आहे.


चित्रांगदा नेहमीच सिनेमात विविध थाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘देसी बॉइज’ सिनेमात ती ग्लॅमरस अंदाजात दिसली होती.   यानंतर  इनकार, आय, मी और मै अशा अनेक सिनेमांत ती झळकली. चित्रपटात येण्यापूर्वी तिने दिल्लीमध्ये मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती. मॉडेलिंगनंतर चित्रांगदाने म्यूझिक व्हिडिओमध्ये काम केले.  

Web Title: Chitrangada Singh to share screen with Italian actor Marco, first look out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.