केवळ ३५ वर्षांच्या या दाक्षिणात्य सुपरस्टारकडे आहे बॉलिवूड अभिनेत्यापेक्षा जास्त पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 06:00 IST2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:03+5:30

या अभिनेत्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले असून त्याला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे.

Chiranjeevi Son Superstar Ram Charan is reach actor PSC | केवळ ३५ वर्षांच्या या दाक्षिणात्य सुपरस्टारकडे आहे बॉलिवूड अभिनेत्यापेक्षा जास्त पैसा

केवळ ३५ वर्षांच्या या दाक्षिणात्य सुपरस्टारकडे आहे बॉलिवूड अभिनेत्यापेक्षा जास्त पैसा

ठळक मुद्देराम चरणची जवळपास १३०० कोटींची प्रॉपर्टी आहे. राम चरण हैदराबादमधील एअरलाईन ट्रू जेटचा मालिक आहे. याशिवाय त्याची रामचरण हैदराबाद पोलो राइडिंग क्लब नामक पोलो टीम देखील आहे.

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा मुलगा राम चरणचा आज वाढदिवस असून त्याने आज टॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. राम चरणला त्याच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार  मिळाले आहेत. राम चरण हा प्रचंड श्रीमंत अभिनेता असून बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा देखील त्याची कमाई चांगली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

राम चरणकडे प्रचंड पैसा आहे. तो केवळ एका चित्रपटात काम करायचे करोडो रुपये घेतो. एवढेच नाही तर चित्रपटांव्यतिरिक्त त्याला जाहिरातींद्वारे देखील खूप सारा पैसा मिळतो. तो आघाडीचा अभिनेता असल्याने तो अनेक प्रसिद्ध ब्रँडचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. तसेच त्याने पर्सनल इन्व्हेसमेंटदेखील खूप चांगल्याप्रकारे केली आहे. राम चरण हैदराबादमधील जुबली हिल्स सारख्या प्राईम लोकेशनमध्ये ३८ कोटींच्या बंगल्यात राहतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरणचे घर दाक्षिणात्य सेलिब्रेटींच्या घरामध्ये खूप महागडे आहे. राम चरण अभिनेत्याशिवाय एक यशस्वी बिझनेसमनदेखील आहे.

राम चरणची जवळपास १३०० कोटींची प्रॉपर्टी आहे. राम चरण हैदराबादमधील एअरलाईन ट्रू जेटचा मालिक आहे. याशिवाय त्याची रामचरण हैदराबाद पोलो राइडिंग क्लब नामक पोलो टीम देखील आहे. तो माँ टीव्हीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये देखील आहे. राम चरण एका सिनेमासाठी जवळपास १२ ते १५ कोटी रुपये मानधन घेतो. राम चरणचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे ज्याचं नाव आहे कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी. राम चरण दोन तमीळ चित्रपटांची निर्मिती करणार असून तमीळ चित्रपट 'तूफान'साठी त्याने गाणं गायलं आहे. राम चरणने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये जंजीर या चित्रपटात काम केले होते. 

राम चरणने १४ जून, २०१२ला अपोलो हॉस्पिटलचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रताप सी. रेड्डीची नात उपासना कमिनेनीसोबत लग्न केले असून त्यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. तो लवकरच बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या RRR या ब्लॉकबास्टर चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Chiranjeevi Son Superstar Ram Charan is reach actor PSC