​शाळेत जायला लागला चिमुकला अबराम! शाहरूख खानने पापाराझींना केले अलर्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 14:06 IST2017-10-05T08:34:41+5:302017-10-05T14:06:48+5:30

मुलांची गोष्ट आली की, शाहरूख खान कमालीचा हळवा होतो. आर्यन खान, सुहाना खान किंवा चिमुकला अबराम या तिघांनाही शाहरूख ...

Chimukala Aburam started going to school! Shah Rukh Khan made alert to Paparazzi !! | ​शाळेत जायला लागला चिमुकला अबराम! शाहरूख खानने पापाराझींना केले अलर्ट!!

​शाळेत जायला लागला चिमुकला अबराम! शाहरूख खानने पापाराझींना केले अलर्ट!!

लांची गोष्ट आली की, शाहरूख खान कमालीचा हळवा होतो. आर्यन खान, सुहाना खान किंवा चिमुकला अबराम या तिघांनाही शाहरूख जीवापाड जपतो. शाहरूखप्रमाणेच त्याची ही तीन मुलेही प्रचंड लोकप्रीय. अबरामबद्दल तर विचारायची सोय नाही. शाहरूख इतकीच अबरामचीही क्रेझ आहे. केवळ चाहत्यांनाच नाही तर पापाराझींना सुद्धा. त्यामुळे अबराम दिसला रे दिसला की, पापाराझींचे कॅमेरे त्याच्याकडे वळतात. पण आता पापाराझींचे कॅमेरे अबराम खानकडे वळता कामा नये!  आता आम्ही अचानक  हा धमकीवजा इशारा का देतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा धमकीवजा इशारा आम्ही नाही तर खुद्द शाहरूख खानने दिला आहे.
होय, शाहरूखचा लाडका चिमुकला आता शाळेत जाऊ लागला आहे. धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अबरामने प्रवेश घेतलाय. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत अबराम शाळेत असतो. यादरम्यान अबरामला कुणीही डिस्टर्ब करू नये, यासाठी शाहरूखचे सगळे प्रयत्न सुरु आहेत. अबराम नॉर्मल मुलासारखा वाढावा. शाळेत त्याच्या सेलिब्रिटी स्टेट्सपेक्षा एक सामान्य विद्यार्थी म्हणून त्याला ओळखले जावे, असे शाहरूखला वाटते आणि त्याचमुळे शाळेच्या आवारात किंवा त्यादरम्यानच्या प्रवासात अबरामचे फोटो घेऊ नये, असे शाहरूखने फोटोग्राफर्सला बजावले आहे. धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बहुतांश बॉलिवूड सेलिब्रिटींची मुले शिकतात. त्यामुळे या शाळेच्या गेटवर अभूतपूर्व सुरक्षा असते. मीडियाला हँडल करण्यासाठी या शाळेत स्वतंत्र व्यवस्था आहे. पण तरिही शाहरूख स्वत: याबाबत कमालीची अलर्ट आहे. 

ALSO READ : ​पाहा, शाहरूख खान व गौरी खानचे candid-moments !!

मध्यंतरी शाहरूख खानची लाडकी सुहाना खान आपल्या मित्रांसोबत ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट बघण्यासाठी गेली होती. मात्र सुहानाला बघताच काही मीडियावाल्यांनी तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मीडियाचे कॅमेरे बघितल्यानंतर सुहाना खूपच घाबरून गेली होती. हा सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. असे काही अबरामबद्दल होऊ नये, कदाचित हाच शाहरूखचा प्रयत्न दिसतोय.

Web Title: Chimukala Aburam started going to school! Shah Rukh Khan made alert to Paparazzi !!