बहुचर्चित विकी कौशलच्या 'छावा'चा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार? आताच जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:25 IST2025-01-22T15:24:08+5:302025-01-22T15:25:14+5:30
विकी कौशलच्या बहुचर्चित 'छावा' सिनेमाचा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर

बहुचर्चित विकी कौशलच्या 'छावा'चा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार? आताच जाणून घ्या
'छावा' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. गेल्या काही महिन्यांपासून 'छावा'चं पोस्टर, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली. अशातच काल 'छावा'च्या कलाकारांचे फर्स्ट लूक समोर आले. आता ज्याची सर्वांना उत्सुकता आहे अशा 'छावा'चा ट्रेलर लाँच आज होणार आहे. 'छावा'चा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार, याविषयी मॅडॉक फिल्मसने मोठी अपडेट दिली आहे.
किती वाजता बघायला मिळणार 'छावा'चा ट्रेलर
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर आज संध्याकाळी ५.१५ वाजता रिलीज होणार आहे. युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित होईल. मॅडॉक फिल्मसने 'छावा'च्या ट्रेलर लाँचबद्दल ही माहिती दिली आहे. आज मुंबईतील प्लाझा थिएटरमध्ये कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत 'छावा'चा भव्यदिव्य पद्धतीने आणि थाटामाटात ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे.
'छावा' कधी रिलीज होतोय?
'मिमि', 'लुकाछुपी' अशा सिनेमांमधून प्रेक्षकांची पसंती मिळवलेले दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलंय. 'छावा'मध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसणार आहे. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडच्या इतिहासातील शूरवीर मराठा योद्ध्याची कहाणी सांगणारा एक भव्यदिव्य सिनेमा म्हणून 'छावा'ला ओळखलं जातंय.