‘सौ आसमान’ गाण्यात सिद्धार्थ-कॅटरिनाची केमिस्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 10:10 IST2016-08-11T04:40:44+5:302016-08-11T10:10:44+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ हे आगामी ‘बार बार देखो’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातील ‘काला चश्मा’ गाणे आऊट झाले आणि यू ट्यूबवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. दोघांचीही केमिस्ट्री अतिशय उत्तम अशी आहे.

Chemistry of Siddhartha and Katrina singing 'Hundred Skies' | ‘सौ आसमान’ गाण्यात सिद्धार्थ-कॅटरिनाची केमिस्ट्री!

‘सौ आसमान’ गाण्यात सिद्धार्थ-कॅटरिनाची केमिस्ट्री!

 
िद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ हे आगामी ‘बार बार देखो’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातील ‘काला चश्मा’ गाणे आऊट झाले आणि यू ट्यूबवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. दोघांचीही केमिस्ट्री अतिशय उत्तम अशी आहे.

वेल, काला चश्मा नंतर आता ‘सौ आसमान’ हे गाणे आऊट झाले आहे. अरमान मलिक आणि नीती मोहन यांच्या आवाजातील हे गाणे असून अतिशय सुंदर आणि मनमोहक पद्धतीने यातील सीन्स तयार केले आहेत. कर्णमधूर आणि नयनरम्य असे हे गाणे चाहत्यांना आवडेल यात काही शंका आहे का?

कॅटरिना आणि सिद्धार्थ यात अतिशय कुल लूकमध्ये दिसत आहेत. थायलंडच्या पनोरमा येथे रोमान्स करताना दिसत आहेत. कॅटरिनाचा हॉट लूक या गाण्याचे विशेष म्हणावे लागेल. दिग्दर्शक नित्या मेहरा यांचा आगामी बार बार देखो चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

">http://

Web Title: Chemistry of Siddhartha and Katrina singing 'Hundred Skies'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.