रिया चक्रवर्तीच्या चेहऱ्यासाठी ‘चेहरे’वर लागली मोठी बोली, हॉटस्टारने मोजले कोट्यावधी रूपये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 13:08 IST2020-12-11T13:06:39+5:302020-12-11T13:08:36+5:30

चित्रपटाचे नाव आहे, ‘चेहरे’ आणि भलीमोठी रक्कम मोजण्याचे कारण आहे, या सिनेमातील एका ‘चेहरा’.

Chehre: Rhea Chakraborty, Amitabh Bachchan & Emraan Hashmi Starrer Goes For A Huge Price To Disney + Hotstar? | रिया चक्रवर्तीच्या चेहऱ्यासाठी ‘चेहरे’वर लागली मोठी बोली, हॉटस्टारने मोजले कोट्यावधी रूपये?

रिया चक्रवर्तीच्या चेहऱ्यासाठी ‘चेहरे’वर लागली मोठी बोली, हॉटस्टारने मोजले कोट्यावधी रूपये?

ठळक मुद्दे‘चेहरे’ हा सिनेमा यावर्षी 24 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्व चित्रपटगृहे जवळजवळ 7 महिन्यांपासून बंद होती. या काळात ओटीटीला सुगीचे दिवस आलेत. अनेक सिनेमे या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेत. चित्रपटगृहांऐवजी थेट ओटीटीवर रिलीज झालेला पहिला सिनेमा ‘गुलाबो सिताबो’ होता. या सिनेमात अमिताभ बच्चन व आयुष्यमान खुराणा मुख्य भूमिकेत होते. आता अमिताभ यांचा आणखी एक सिनेमा ओटीटीवर रिलीज होतोय आणि यासाठी हॉटस्टारने भलीमोठी रक्कम मोजल्याचे कळतेय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘चेहरे’ आणि भलीमोठी रक्कम मोजण्याचे कारण आहे, या सिनेमातील एका ‘चेहरा’.

होय, ‘चेहरे’ या सिनेमात रिया चक्रवर्ती महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रियासोबत जे काही घडले, ते संपूर्ण जगाने पाहिले. गेल्या काही महिन्यात यामुळे ती सतत चर्चेत आहेत. आता याचा फायदा मेकर्स घेणार नाहीत, असे कसे होणार? मेकर्सच्या मते, रियासोबत जे काही घडले, ज्यामुळे ती चर्चेत राहिले, त्यानंतर तिच्याबद्दल जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहेत. अशात तिचा सिनेमा रिलीज होणार म्हटल्यानंतर या सिनेमालाही तिच्या नावाचा फायदा होणार. याचमुळे ‘चेहरे’चा भाव वाढवण्यात आला. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी या सिनेमासाठी मोठमोठी बोली लावली आणि अखेर हॉटस्टारने बाजी मारली.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, या सिनेमासाठी हॉटस्टारने मोठी रक्कम मोजली आहे.  

‘चेहरे’ हा सिनेमा यावर्षी 24 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली नाही. मात्र हा सिनेमा हॉटस्टारवर रिलीज होणार असल्याचे वृत्त आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी, रिया चक्रवर्ती शिवाय क्रिती खरबंदा, सिद्धांत कपूर व अन्नू कपूर यांच्या भूमिका आहेत.

तब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन 

Web Title: Chehre: Rhea Chakraborty, Amitabh Bachchan & Emraan Hashmi Starrer Goes For A Huge Price To Disney + Hotstar?